कर्जवाटप न झाल्यास संचालकांना बँकेत फिरु देणार नाही

0
जळगाव  /  शेतकर्‍यांचा संबंध हा थेट जिल्हा बँकेशी येतो. त्यामुळे जिल्हा बँकेने आठ दिवसात शेतकर्‍यांना कर्जवाटप करावे, अन्यथा संचालक मंडळाला बँकेत फिरु देणार नाही, असा अल्टीमेटम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांनी दिला.
दरम्यान जिल्ह्यातील भाजपा आणि शिवसनेच्या मंत्र्यावरही त्यांनी टिकेची तोफ डागली.
शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसदर्भात आज जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना शेतकर्‍यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांनी सांगितले की, एकेकाळी आशिया खंडात नावाजलेली ही बँक आज शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी दिसत नाही.

आम्ही देखिल या बँकेत चेअरमन होतो. त्यावेळी राज्यात सर्वाधिक कर्जवाटप करणारी बँक म्हणुन जळगावच्या जिल्हा बँकेचा गौरव झालेला आहे.

सध्याच्या काळात मात्र शेतकर्‍यांना जिल्हा बँक कर्जपुरवठा करीत नाही ही दुर्देैवाची बाब आहे. पेरणीसाठी लागणारी खते बियाणे घेण्यासाठी शेतकर्‍याकडे पैसा उपलब्ध नाही.

या सरकारने कर्जमाफीचे गाजर दाखवुन शेतकर्‍याची फसवणुक केली आहे. बँकेच्या संचालक मंडळात मुख्यमंत्री होतील एवढ्या ताकदीचे लोकप्रतिनीधी आहेत.

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी शेतकर्‍यांसाठी आंदोलन केले होते. ते देखिल या बँकेचे संचालक असुनही आता गप्प का बसले आहेत? काही कळत नाही असा टोलाही आ. डॉ. सतीष पाटील यांनी लगावला.

शिवसेनेची राजकीय नौटंकी
केंद्रात आणि राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी आहेत. असे असतांना शेतकर्‍यांच्या व्यथा मांडण्यासाठी ते आंदोलनाची भाषा करीत आहे. ही त्यांची राजकीय नौटंकी असल्याची खिल्लीही आ. डॉ. पाटील यांनी उडविली. चार दिवसात शेतकर्‍यांना कर्जवाटप सुरू न झाल्यास आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशाराही आ. डॉ. सतिष पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला.

LEAVE A REPLY

*