शेतकर्‍यांचा जिल्हा बँकेवर हल्लाबोल

0
जळगाव  / शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आज जिल्हा बँकेवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वसुली कमी झाल्याने त्याचा परीणाम कर्जवाटपावर झाला आहे. तसेच जिल्हा बँकेकडे 220 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा पडुन असुन व्याजाचे दैनंदीन 10 लाख रूपयांचे नुकसान होत आहे.
सरकार आणि आरबीआयच्या धोरणामुळे जिल्हा बँक शेतकर्‍यांना वेठीस धरीत आहे. या विरोधात जिल्हा बँकेच्या संचालकांसह विरोधकांनीही आता आवाज उठवायला सुरूवात केली.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आज जिल्हा बँकेवर हल्लाबोल केला.

एमडींना खाली बोलावुन निवेदन दिले
जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक यांनी शेतकर्‍यांसाठी दालनाबाहेर खाली येऊन निवेदन घ्यावे अशी मागणी करण्यात आली.

बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख यांनी ही मागणी मान्य करीत शेतकर्‍यांच्या मागण्यांचे निवेदन आ. डॉ. सतिष पाटील यांच्या हस्ते स्विकारले.

 

LEAVE A REPLY

*