खंडेरावनगरातील 150 घरांच्या डीपीआर प्रस्तावाच्या मंजूरीसाठी आज सभा

0
जळगाव / प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी खंडेराव नगरात 150 घरांचा डीपीआर तयार करुन शासनाकडे मंजूरी पाठविण्याबाबतच्या प्रस्तावासह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्या दि.9 रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभा सभापती डॉ.वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात खंडेराव नगरात 150 घरे बांधण्यात येणार आहेत.
सर्व्हेक्षणानुसार खंडेरावा नगरात 1152 झोपड्या आहेत. या जागेवर प्रथम 150 घरांचा डीपीआर तयार करुन 8 कोटी 54 लाख 67 हजार रुपयांचा प्रस्ताव सादर केलेला आहे.

त्यानुसार एका घराच्या बांधकामास 5 लाख 18 हजार रुपये खर्च आहे. यात केंद्र सरकार 1लाख 50 हजार व राज्य सरकार तर्फे 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

दरम्यान, मनपा प्रशासनाने स्वातंत्र डीपीआर तयार केला असून अंतिम मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

मनपावर असलेल्या हुडकोच्या एकरकमी कर्जफेडीच्या कामासाठी सनदी लेखापाल अनिल शाह यांना पुढील 6 महिने वाढ देण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करुन निर्णय घेणे, ट्रान्सफार्मरच्या आईल खरेदीस मान्यता देणे, पाणीपुरवठा विभागासाठी ग्रीस खरेदी करणे, चारही प्रभाग समितींमध्ये पथदिवे व लाईट दुरुस्ती खर्चासाठी मान्यता देणे, मनपा बालवाड्यांना पोषण आहार पुरविण्यास मान्यता देणे, लिप्ट देखभाल दुरुस्तीसाठी मुदतवाढ देणे यासह 11 विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*