मनपाच्या तळमजल्यात साचले पाणी

0
जळगाव  / शहरात रात्री झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील अयोध्यानगर, रामानंदनगर, शाहूनगर, तांबापुरा, बजरंग बोगदा या भागात पाणी साचले होते.
तसेच मनपाच्या तळमजल्यावरील आवक-जावक विभागात पाणी साचले होते.
शहरात काल दीड ते दोन तास झालेल्या दमदार पाऊस झाला. रामानंदनगर, अयोध्यानगर, शाहूनगर, तांबापुरा, बजरंग बोगदा या भागात पाणी साचले होते. तसेच शहरातील छोटे नाले देखील ओसंडून वाहत होते.

नागरिकांचे हाल
शहरातील नाल्याच्या काठावर असलेल्या झोपड्यांमध्ये पाऊस साचले होते. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होते.
अनेक भागात रस्त्यांवर पाणी

शहरातील अनेक भागांमध्ये गटारी तुंबल्यामुळे व्यवस्थित पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे गटारीतील पाणी रस्त्यावर वाहू लागले होते.

अजिंठा चौफुलीजवळी सातपुडा ऑटोमोबाईलस शोअरुममध्ये देखील पाणी साचले होते.

साचलेले पाणी मोटरपंप लावून काढले
मनपा सतरा मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या आवक-जावक विभागात रात्री झालेल्या पावसामुळे पाणी साचले होते. सकाळी मनपा कर्मचार्‍यांनी मोटरपंप लावून पाणी काढले.

 

LEAVE A REPLY

*