जळगाव पंचायत समितीच्या बीडीओंना नोटीस

0
जळगाव  /  घरकुलांच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अनुपस्थित राहील्याने तसेच तालुक्यातील घरकुलांबाबत प्रचंड घोळ असल्याने आज सीईओ यांनी बीडीओ शकुंतला सोनवणे यांना नोटीस बजाविली आहे.
पंतप्रधान घरकुल योजना, शबरी आवास व इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्याच्या समस्या सोडविण्यासाठी दि. 9 रोजी पंचायत समिती जळगाव येथील बीडीओंनी बैठक आयोजित केली होती़.

परंतु त्यांच्यासह संबंधीत अधिकारी उपस्थित राहीले नाही, त्याच बरोबर घरकुलांबाबत प्रचंड घोळ असल्याने आज सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी बीडीओ यांना नोटीस बजावली असून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे.

तालुक्यात घरकुल योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना मिळत नाही, एकूणच घरकुल योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*