युपीच्या ठगाने 444 ठेवीदारांना गंडविले

0
जळगाव  / शहरात विसनजीनगरमध्ये निर्मिती रिअल सर्व्हीसेस प्रा.लि. कंपनी स्थापन करुन उत्तर प्रदेशमधील पंकज रणवीर राठोड याने जिल्ह्यातील ठेवीदारांची फसवणूक केली. त्याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे.

चौकशीदरम्यान जिल्ह्यातून 444 ठेवीदारांकडून 31 लाख 85 हजार 490 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्याच्याविरुध्द महाराष्ट्र ठेवीदार अधिनियमन 1999 चे कलम 3 अतिरिक्त लावण्यात आले.

त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची पाच दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*