एवढाचं कळवळा असेल तर सत्तेतून बाहेर पडावं-राणे

0
मुंबई / राजीनामे देण्याची तयारी दाखवणारी शिवसेना ही नौटंकी करतंय. एवढंच जर सत्तेतून बाहेर पडायचं असेल तर शेतकर्‍यांसाठी बाहेर पडून दाखवा.
सेनेचे मंत्री ढोंगी आहे. सत्ता यांना सुटणार नाही अशी घणाघाती टीका काँग—ेसचे नेते नारायण राणे यांनी केलीये.
नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीये. महाराष्ट्रात असलेलं युतीचं सरकार नसून हे सहकार्याचं सरकार आहे.
सत्तेचा ही लाभ घ्यायचा आणि विरोधकही राहायचं. ही दिशाभूल करणारी भूमिका आहे. आजची सेनेची भूमिका हास्यास्पद आहे.

कॅबिनेटमधून हे उठून आले. जर बहिष्कार होता तर कॅबिनेटमध्ये जाण्याची गरज काय होती. आणि मग म्हणायचं आमचा बहिष्कार होता अशी खिल्ली राणेंनी उडवली.

तसंच सेना सत्तेबाहेर पडूच शकत नाही. सत्तेवर आल्यापासून त्यांचं हे सुरू आहे. त्यांचे नेते शेतकर्‍यांशी गद्दारी करतायेत असा आरोप राणेंनी केला.

मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगण्याची काहीही गरज नाही. ते सरकारमध्ये नाहीयेत. उद्धव ठाकरे सरकारचा भाग नाहीये. भलेही सेनेचे पक्षप्रमुख असतील.

सेनेच्या मंत्र्यांनी उद्धवना माहिती दिली पाहिजे, असा टोलाही राणेंनी लगावला.

LEAVE A REPLY

*