आमचा संपाला पाठिंबा – नाना पाटेकर

0
मुंबई / विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यभरात संप पुकारला आहे. या संपाला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर आता नाम फाउंडेशननेही या संपाला पाठिंबा दिला आहे.
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पत्रकार परिषद घेवून संपाला पाठिंबा असल्याचे म्हटले. जगण्यासाठी शेतकर्‍यांना संप करावा लागतो. ही वाईट गोष्ट असल्याची भावनाही यावेळी नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.
नाना पाटेकर म्हणाले, की आमचा या संपाला पाठिंबा आहे. शेतकर्‍यांनी एक संघटना तयार करुन समोर यावे. शेतकर्‍यांनो एकत्र या पण जाळपोळ किंवा आंदोलनाला हिंसक वळण लागेल असे काहीही करु नका, असे आवाहनही त्यांनी शेतकर्‍यांना केले.
मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करुन त्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा, अशी मागणीही पाटेकर यांनी केली.

मकरंद अनासपुरे म्हणाले, की जो गळफास लावू शकतो तो गळफास देवूही शकतो. संपामुळे शेतकरी बांधव एकवटले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आता सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

सोशल मीडियातून नाना पाटेकर व मकरंद यांचे मॅसेजेस व्हायरल होत आहेत. यावर स्पष्टीकरण देताना मकरंद म्हणाले, की ते मॅसेजेस मी किंवा नाना यांनी लिहिलेले नाही.

आम्ही आमची भूमिका अधिकृत पेजवरुनच किंवा माध्यमांसमोर मांडतो. त्यामुळे लोकांनी अशा खोट्या पोस्टकडे दुर्लक्ष करावे व त्यावर विश्वास ठेवू नये, असे म्हटले.

LEAVE A REPLY

*