जिल्ह्यात कापसाच्या 24 वाणांच्या विक्रीला स्थगिती

0
जळगाव  /  गेल्या चार ते पाच दिवसापुर्वीच कृषी आयुक्तांनी राशीच्या बीटी 2 च्या 659 या वाणाच्या विक्रीस स्थगिती दिली असतांना जिल्ह्यात या खरीप हंगामात तब्बल 24 कापसाच्या वाणांना विक्रीस स्थगिती दिली असल्याची माहीती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली आहे.
या वाणांमध्ये बीटीच्या अंकुर 3034 चा देखील समावेश आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असतांना तब्बल 24 वाणांच्या विक्रीस स्थगिती आल्याने बियाण्यांवरून शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कापसाच्या विविध कंपन्याच्या वाणांबाबत तक्रारी आल्याने 24 वाणांच्या विक्रीवर स्थगिती आली आहे. ज़िल्ह्यात पुर्व हंगामी कापसाचा पेरा सुरू झाला असतांना अद्याप शेतकर्‍यांना बियाणे मिळत नाही.
ज़िल्ह्यात सर्वाधिक विक्री होत असलेल्या 659 या वानाच्या विक्रीला स्थगिती आली असल्याने शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करण्यास अडचणी येत आहे.

जिल्ह्यात पहिल्या टप्यात राशीच्या 29 हजार 200 पाकीटे बाजारात आली होती.

मात्र चार दिवसापुर्वीच शासनाकडून राशीच्या 659 च्या विक्रीला स्थगिती आली असल्याने 19 जार 400 पाकीेटे डिस्टीब्युटरकडे पडून आहे.

ती विक्री न करण्याचे आदेश कृषीे विभागाने बजावले आहे,असे कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*