मुख्यमंत्री शुक्रवारी जळगावात

0
जळगाव / केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकार विभागातर्फे जिल्हयातील 2301 दिव्यांगांना विविध प्रकारची अत्याधुनिक उपकरणे दि.9 रोजी सागरपार्क येथे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मंत्री उपस्थितीत राहणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत दिव्यांग बांधवांना त्यांच्या गरजचे उपकरणे मोफत वाटप केली जातात. यात तीनचाकी सायकल, कुबड्या, व्हिलचेअर, आधारकाठी, अंध व्यक्तिंना लेझर सेंन्सर उपकरण, बेर्ल लिपीतील मोबाईल वाटप केले जाणार आहे.

याच योजनेंतर्गत जळगाव जिल्हयातील 2301 लाभार्थ्यांना दि.9 रोजी विविध उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची देखील उपस्थिती राहणार आहे.

LEAVE A REPLY

*