उमविचे मुख्य प्रवेशद्वारच सुरु राहणार

0
जळगाव / उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात अपरिचीत व्यक्तींचा वापर वाढला असून धोका उद्भवण्याची संभावना असल्याने मुख्य प्रवेशद्वारा व्यतिरिक्त विद्यापीठात येणारे सर्व मार्ग बंद करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला असून याबाबतचे पत्र प्रभारी कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक विभाग, प्रशासकीय विभाग व महाविद्यालयाने दिले आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शैक्षणिक कामकाजाच्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थामधील, व्यक्ती, विद्यार्थ्यांसह विद्यापीठात येणार्‍या वाहनांची वर्दळ वाढली आहे.

गेल्या काही दिवसांत विद्यापीठाच्या परिसरात अपरिचीत व्यक्तींचा वावर वाढला असल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या निर्दशनास आले आहे.

अशा व्यक्तींकडून विद्यापीठांच्या मालमत्तेला व साधन सामुग्रीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यापीठात येण्यासाठी व जाण्यासाठी मुख्य प्रवेशाद्वारा व्यतिरिक्त सर्व मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे पत्र जारी केले आहे.

तसेच विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येण्या-जाण्यासाठी मुख्य प्रवेशाद्वाराचा वापर करावा असे प्रशासनाच्यवतीने सुचित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*