सोनसाखळी लांबविणार्‍या दोघांना तीन वर्षाची शिक्षा

0
जळगाव / पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर येवून महिलांची मंगळपोत लांबविणार्‍या दोघांना जिल्हा न्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा सुनाविली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथील रजनी रविंद्र अत्तरदे ह्या जळगावात गणपतीनगरमध्ये आल्या होत्या. सकाळी बाहेर उभे असतांना त्यांच्याकडे दोन महाविद्यालयीन तरुण दुचाकीवर आले.
त्यांनी अत्तरदे यांना पत्ता विचारला. याचवेळी त्यांच्या गळ्यातील 8 ग्रॅमची मंगळपोत चोरट्यांनी लांबविली. ही घटना दि. 18 मे 2015 रोजी घडली.
याप्रकरणी रामानंदनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात रामानंदनगर पोलीसांनी केतन पाटील व हर्षल भावसार या दोघांना अटक केली.

त्यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पाठविल्यानंतर न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात कामकाज निघाले.

सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले. या खटल्यामध्ये सरकारपक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आलेत. साक्षीदारांच्या पुराव्यांवरुन न्यायालयाने भादंवि कलम 392 खाली दोघं संशयीतांना दोषी धरले.

यात 3 वर्ष शिक्षा, 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनाविली. संशयीतातर्फे अ‍ॅड. प्रदिप देशमुख यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*