कारवाईचे लष्कराला ठरवू द्या !

0
नवीदिल्ली / एखाद्या परिस्थितीत सैन्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यावेळी करण्यात येणारी कारवाई परिस्थितीनुरुप असते त्यामुळे त्यावर टीका करणार्‍यांनी लष्कराला कचाट्यात पकडू नये.
काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जीपवर तरुणाला बांधून अनेक प्राण वाचविण्याचे कर्तृत्व मेजर गोगोई यांनी केले असून हे कार्य गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केले.

त्याचवेळी कारवाईचे लष्करालाच ठरवू द्या, त्यात कुणीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करु नये, असेही टीकाकारांना बजावले. एखादी स्थिती कशी हाताळायची, हे लष्कराचे लष्करालाच ठरवू द्या!, असे सांगत संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज मेजर गोगोई यांच्या कृतीचे समर्थन केले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर जेटली प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना काश्मीरमधील दगडफेकीच्या घटना आणि मेजर गोगोई यांच्या सन्मानाबाबत विचारले असता त्यांनी लष्कराला ‘फ्री हँड’ देण्यावर जोर दिला.

काश्मीरमध्ये पोटनिवडणुकीदरम्यान हिंसाचार उसळला होता. तेव्हा दगडफेक करणार्‍या समाजकंटकांना रोखण्यासाठी मेजर गोगोई यांनी एका दगडफेकखोराला जीपच्या बोनेटवर बांधून त्याची मानवी ढाल केली होती. या मेजरचा नुकताच लष्कराने सन्मान केल्याने त्यावरुन उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

या पार्श्वभूमिवर एखादी स्थिती कशा हाताळायची याचा निर्णय लष्करालाच घेऊ द्या, असा टोला संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी टीकाकारांना लगावला आहे.

 

LEAVE A REPLY

*