कोपर्डी बलात्कार : खून प्रकरणी सरकारी सुनावणी पूर्ण, आता लक्ष निकालाकडे

0
अहमदनगर / कोपर्डी बलात्कार व खून खटल्याच्या सरकारी पक्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. तब्बल पाच महिन्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात एकूण 31 साक्षीदार तपासून त्यांची सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे.
आता पुढील सुनावणीत 21 ते 23 जूनला आरोपींचे जबाब घेतले जाणार आहेत. याविषयीची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
आरोपींच्या जबाबानंतर युक्तीवाद सुरू होणार असून त्यानंतर आरोपींना शिक्षा सुनावली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोपर्डी खटला सुरू झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात पहिली साक्षी 20 डिसेंबरला पार पडली तर शेवटची साक्ष साक्षीदार 24 मे ला पार पडली.

आरोपींचे जबाब नोंदवल्यानंतर युक्तीवाद होणार असल्याने राज्याची नजर न्यायालयाच्या निकालाकडे लागली आहे. दरम्यान बुधवारच्या सुनावणीत आरोपींना पकडणार्‍या भाऊसाहेब कुरुंद यांची साक्ष आणि उलट तपासणी पार पडली.

कुरुंद यांनी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भरलेला यांना अटक केली होती.

LEAVE A REPLY

*