निलेश भिल संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून विचारणा

0
मुक्ताईनगर / तालुक्यातील कोथळी येथील अपहृत राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल सह त्याच्या लहान भावाचा गेल्या सातदिवसांपासुन पोलिस कसुन शोध घेत आहेत यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडूनही विचारणा करण्यात आहे. परंतु कोणताच धागा गवसत नसल्याने शोध कार्यास विलंब लागत असल्याचे पोलिस प्रशासनातर्फे सांगितले जात आहे.
गेल्या १७ पासुन राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल व त्याचा लहान भाऊ गणपत हे त्यांच्या कोथळी येथील राहत्या झोपडीतुन दिसेनासे झाले.

त्यासंदर्भात त्याची आई सुंदरबाई रेवाराम भिल यांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतु त्यांच्या बाबत काहीच सुगावा लागत नसल्याने त्याच्या आई ने माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांना सदर माहीती देताच त्यांनी पोलिसात फिर्याद देण्याच्या सूचना त्याच्या आईला केल्या व त्यानुसार त्याच्या फिर्यादीवरुन  दि  १९ ला सदर बालकांच्या अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 या शोधार्थ आजपर्यंत पोलिस प्रशासनाने सहा पथके तयार करण्यात आली असून यामार्फत आजपर्यंत वनपरीक्षेत्र , सर्व सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, टपऱ्या, दुकाने , धरण, नदी ,पुल, तलाव तसेच रेल्वेस्टेशन, बसस्थानके यावल, बुऱ्हानपूर,मलकापूर, बोदवड असा आजूबाजूच्या सर्व ठिकाणी पोलिस पथकांनी अपहृतांच्या फोटो असलेले स्टिकर्स दाखवून विचार्पुस केलेली आहे इतकेच नव्हे तर गावोगावचे पोलिस पाटील, सामाजिक संस्था यांचीही शोध कार्यात मदत घेतली जात आहे.

इतकेच सोशल मीडिया मार्फत सुद्धा त्यांच्या बाबत माहीती फिरवली जात आहे. तर यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातर्फे सुद्धा विचार करण्यात आली असुन याबाबत अपहृत बालकांचा लवकरात लवकर शोध घेण्याच्या सूचना ही पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांना पंतप्रधान कार्यालयातुन आलेल्या देण्यात आलेल्या आहेत.

तर तपासाधिकारी उपनिरिक्षक वंदना सोनूने यांनी सदर बालकांचा शोध घेण्याच्या तपासाची चक्रे अधिक गतिमान करणार असल्याचे सांगितले, परंतु याबाबत तपासकामी अद्यापही योग्य धागा गवसत नसल्याने तपासकामात मात्र अडसर निर्माण होत आहे.

त्यासाठी  पोलिस प्रशासनामार्फत सर्व सामाजिक संस्था पोलिस पाटील तसेच सार्वजनिक ठिकानांना भेटी देवून युद्धपातळीवर तपास चक्रे फिरविली जात आहे.

परंतु अद्याप कोणताही सुगावा हाती सापडत नसल्याने शोध कार्यात अडथळे येत आहेत

LEAVE A REPLY

*