पुणे येथे १०० कोटींचे ड्रग्स जप्त

0
पुणे(प्रतिनिधी)–मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक सेलने गेल्या दोन दिवसांपासून सुरु ठेवलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीत छापेमारी करुन जवळपास १०० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे.
एका फॅक्टरीमध्ये कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग तयार केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबईतील मानखुर्दमध्ये डोरजी नावाच्या एका व्यक्तीला पकडल्यानंतर यासंबंधी सुगावा लागला होता.

त्यानंतर नार्कोटिक विभागाचे प्रमुख पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज ही छापेमारी करण्यात आली.

या छापेमारीत साधारण १०० कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. एमआयडीसीमध्ये केमिकलच्या नावाखाली ड्रग्ज तयार केलं जात असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

*