जिल्ह्यातील 492 पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या

0
जळगाव / जिल्हा पोलीस दलातील बदलांबाबत गेल्या काही दिवसांपासुन चर्चा सुरु होती. अखेर पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बदल्यांचे आदेश आस्थापना विभागाने काढले आहेत.
यात जिल्ह्यातील 492 अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

जिल्हा पोलीस दलातील आस्थापनेवरील बदली पात्र पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या आज विनंती व प्रशासकिय बाबींचा विचार करुन बदल्या करण्यात आल्यात.

त्यासंबधी आज आस्थापना विभागाने आदेश पारीत केलेत. यामध्ये सहाय्यक फौजदारांच्या 102, पोलीस हेड कॉस्टेबल 154, नापोकॉ 110, पोलीस कॉस्टेबल 82 आणि महिला पोलीस कर्मचार्‍यांच्या 44 अशा एकुण 492 बदल्या करण्यात आल्यात.

दरम्यान बदली झालेल्या कर्मचार्‍यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचेही आदेश पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत. तसेच जे अधिकारी कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करणार नाहीत त्यांनाही दैनंदिन अहवाल नियंत्रण कक्षाला पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनातील बदल्यांचा विषय चर्चिला जात होता. अखेर आज या बदल्या करुन जिल्हा पोलिस प्रशासनाने आपल्या कर्मचार्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

LEAVE A REPLY

*