कर्जवाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांकडे वर्ग करण्याच्या हालचाली

0
जळगाव  / खरीप हंगामाची पुर्व तयारी अंतिम ठप्प्यात आहे. बि-बियाणांसह खतांचा पुरवठासाठी कर्जमिळेल अशी आस शेतकर्‍याने मनाशी लावुण धरली आहे.
मात्र वसुली अभावी शेतकर्‍यांची बँक समजली जाणारी जिल्हा बँकेने कर्जपुरवठाचे उद्दष्टिपुर्ण करण्यासाठी असमर्थतता दर्शविली आहे. तसेच उद्दीष्ट कमी करुन राष्ट्रीयकृत व खासगी बँकेकडे ते वर्ग करण्याची मागणी करुन शेतकर्‍यांची थट्टा करीत एकप्रकारे बळीराजाच्या छातीवर नांगर घालण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्जमाफीबाबत ठोस न घेतलेले धोरण त्यामूळे कर्जमाफीच्या अपेक्षेपोटी ठप्प झालेली जिल्हा सहकारी बँकेची कर्जवसुली, तसेच नोटबंदीच्या काळातील पडून असलेल्या नोटांमुळे जिल्हा बँकांचे आर्थिक कोंडी झाली आहे.

शेतकर्‍यांनी कर्जपुरवठा करणारी नंबर वन बँक आता ऐनवेळी कर्जपुरवठा करु शकत नसल्याने शेतकरीही हतबल झाला आहे. खरीप हंगामाची प्रक्रिया सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला असला तरी जिल्हा सहकारी बँकेसह अन्य बँकांच्या पीककर्ज वाटपाची स्थिती सुधारलेली नाही.

या बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिल्यानंतर 30 एप्रिलपर्यंत उद्दिष्टाच्या केवळ दोन टक्केच कर्जवाटप झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दुसरीकडे कर्जमाफीच्या अपेक्षेने जिल्हा सहकारी बँकेची कर्जवसुली ठप्प झाली आहे. 2 हजार कोटींपैकी केवळ 500 कोटींची वसुली झाल्यामुळे जिल्हा बँकेकडे या वर्षासाठी पीककर्ज वाटपास पुरेसा निधी उपलब्ध नाही.

असे असताना यंदा जिल्हा बँकेला 1 हजार 12 कोटी 2 लाखांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी जिल्हा बँकेने 30 एप्रिलपर्यंत केवळ 42 कोटी 99 लाख रुपयेच कर्जवाटप केले आहे.

जिल्हा बँकचे उद्दीष्ट कमी करण्याची विनंती
उपनिबंधक विजय जाधव यांना मिळालेल्या बँकाच्या पत्रानुसार त्यांनी जिल्हा बँकेस दिलेले 1 हजार 12 कोटी 2 लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट कमी करुन ते अन्य राष्ट्रीयकृत व खासगी बँकांकडे वर्ग करण्याची विनंती या जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राव्दारे केली आहे.

शेतकर्‍यांची वणवण थांबेल का?
जिल्हा बँकेच्या माध्यमातुन जिल्हातील अनेक विकासोने कर्ज पुरवठ्यासाठी शेतकर्‍यांचे अर्ज घेतले. कर्जाच्या आशेवर असतांनाच ऐन पेरणीपुर्वीच आता कर्ज पुरवठा करण्यास जिल्हा बँकने असमर्थतता दर्शवित उद्दीष्ट वर्ग करण्याचा विनंती अर्जामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्जासाठी शेतकर्‍याची असलेली वणवण थांबेल का? असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

अडीच हजार कोटीचे उद्दिष्ट
कर्जवाटपामध्ये जळगाव जिल्हा हा नेहमी अग्रेसर राहिला आहे. जिल्हासाठी सुमारे 2 हजार 667 कोटी 80 लाख असे कर्जवाटपाचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा बँकेला 1 हजार 12 कोटी 2 लाख, अग्रणी बँकेला 25 कोटी 6 लाख, राष्ट्रीयकृत बँकांना 1 हजार 362 कोटी 50 लाख तर खासगी बँकांना 268 कोटी 22 लाख असे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*