ट्रॅव्हल्सच्या धडकेत ग्रंथपालाचा मृत्यू

0
जळगाव  / रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील महाविद्यालयातील ग्रंथपाल यांच्या दुचाकीला ट्रॅव्हस्ने जोरदार धडक दिली. ही घटना जळगावमधील महामार्गावरील शिवकॉलनी स्टॉपजवळ रात्री 8 वाजेच्या सुमारास घडला. अपघातामुळे ग्रंथपाल यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, वाघनगरमधील रहिवाशी राहुल भिकाजी खंडारे (वय 30) हे रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणुन कार्यरत आहेत.

वाघनगरमध्ये दुचाकीने जात असतांना राहुल खंडारे यांच्या दुचाकी क्रमांक एमएच 19 बीसी.8945 ला जळगावकडे येत असलेल्या शिवशंकर कंपनीची ट्रॅव्हस क्रमांक एमएच.19 वाय 5091ने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये खंडारे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी पुनम खंडारे व मुलगी साक्षी असा परिवार आहे.

खंडारे पीएचडीच्या कामासाठी गेले होते विद्यापीठात
खंडारे हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ग्रंथपाल या विषयावर पीएचडी करीत होते. त्यासाठी ते विद्यापीठात गेले होते. विद्यापीठातून परतत असतांना ती दुर्देवी घटना घडली.

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
घटना स्थाळाहून राहूल खंडारे यांचा मृतदेह जिल्हारूग्णालयात नागरीकांच्या मदतीने पोलीसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात मनहेलावरणारा आक्रोश केला.

LEAVE A REPLY

*