..म्हणून लग्नाच्या 5 व्या दिवशी प्रियांकाचा खून

0
ठाणे / नवविवाहिता प्रियांका गुरव हिच्या हत्येप्रकरणात अटक असलेल्या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली.
सोमवारी या आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सीबीडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावर न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी 3 दिवसांची वाढ केली आहे.
प्रियंकाच्या हत्येप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिच्या पतीसह सासु-सासरे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावणारा दुर्गेशकुमार पटवा तसेच त्याला या कामात मदत करणारा विशाल सोनी या 5 आरोपींना गत आठवड्यात अटक केली होती.
दिवा येथे राहणार्‍या प्रियंका गुरव या तरुणीचा गत 30 एप्रिल रोजी डोंबिवलीतील कोपर भागात राहणार्‍या सिद्धेश गुरवसोबत प्रेम विवाह झाला होता. लग्नानंतर 4 दिवसातच पती सिद्धेश आणि त्याच्या आई-वडीलांनी प्रियंकाची गळा आवळून हत्या केली.

त्यानंतर गुरव कुटुंबियांच्या ओळखीतल्या दुर्गेशकुमार पटवा याने प्रियंकाच्या मृतदेहाचे तुकडे करुन तीचे धड रबाळे एमआयडीसी भागात, तर तीच्या कमरेखालचा भाग अंबरनाथ रोडलगत जाळून टाकला होता. शिवाय तीचे मुंडके वाशिंद येथील जंगलात टाकून दिले होते.

प्रियंकाच्या धडाचा भाग रबाळे एमआयडीसीतील नाल्यात 6 मे ला सापडल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी मृत धडाच्या खांद्यावर गोंदलेल्या ओम आणि गणपतीच्या टॅटूवरून प्रियंकाची ओळख पटविली होती.

त्यानंतर पोलिसानी या हत्याप्रकरणाचा अधिक तपास करत प्रियंकाच्या पतीसह सासू-सासरे आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन विल्हेवाट लावणार्‍या दुर्गेशकुमार पटवा या चौघांना अटक केली.

दुर्गेशकुमार पटवा याने या हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आपला जीवलग मित्र विशाल सोनी याच्यासह त्याच्या कारमधून प्रियंकाच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिल्याचे तपासात आढळून आल्याने पोलिसांनी विशाल सोनी याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली.

गुरव कुटुंबियांनी दुर्गेशकुमार पटवा याला प्रियंकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तसेच त्यातील काही रक्कम देखील दिल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यामुळे गुरव कुटुंबियांनी इतकी मोठी रक्कम कुठून आणली ? तसेच दुर्गेशकुमार पटवा याला मदत करणार्‍या विशाल सोनी याने सुपारीच्या रक्कमेतील किती रक्कम घेतली ? त्याचप्रमाणे मृत प्रियंका गुरव हिची पर्स आरोपींनी कुठे टाकून दिली ? याबाबत पोलीसांचा तपास सुरू आहे.

तसेच आरोपींनी मृत प्रियंकाच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या भागात टाकून दिल्याने त्या-त्या ठिकाणी जाऊन साक्षिदार मिळवून गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक पुरावे गोळा करण्यासाठी सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करावी, अशी मागणी पोलिसांकडून सोमवारी न्यायालयात करण्यात आली. यावेळी न्यायाधीश नदीम पटेल यांनी या गुह्यातील पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ केली.

प्रियांकाला ठार मारण्या मागील कारण

पूर्वीपासून ओळख असलेल्या प्रियंकाची वागणूक आणि तीच्या भांडखोर स्वभावामुळे सिद्धेशने लग्नाआधी तीच्यापासून दुरावा निर्माण केला होता.

प्रियंकाचे इतर तरुणांसोबत असलेले संबंध तसेच तिचा 2 वेळा झालेला गर्भपात, सिद्धेशच्या आई-वडीलांकडून या लग्नाला असलेला विरोध या सर्व गोष्टींचा विचार करुन त्याने प्रियंकासोबत विवाह करण्यास नकार दिला होता.

मात्र सिद्धेशने आपल्या सोबत शारिरीक संबध ठेवल्याचे सांगून आता तो लग्न करण्यास नकार देत असल्याची तक्रार पोलिसांकडे करू, अशी धमकी देऊन प्रियंका सिद्धेशवर दबाव आणत होती. त्यामुळे सिद्धेशने घाबरुन प्रियंकासोबत 30 एप्रिल रोजी विवाह केला होता.

मात्र लग्नानंतर देखील ती सिद्धेश आणि त्याच्या कुटुंबियांवर वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणून त्यांच्याशी उद्धटपणे वागत होती. त्यामुळे सिद्धेश आणि त्याचे आई-वडील वैतागले होते.

त्यामुळेच सिद्धेश आणि त्याच्या आई-वडीलांनी 4 मे रोजी प्रियंकाच्या तोंडावर उशी दाबुन तसेच तिची गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*