गुड्डूराजा नगरात चोरट्यांनी फोडली तीन बंद घरे

0
जळगाव / शहरातील एसएमआयटी परिसरातील गुड्डुराजा नगरातील तीन बंद घरे टार्गेट करून चोरटयांनी हजारो रुपयांची मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
दरम्यान याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे सुरु होते. सुदैवाने दोन घरात काहीही मिळून न आल्याने रिकामे हाती परतावे लागले.
शहरात चोरटयांचा धुमाकुळ सुरुच आहे . ऐन लग्नसराईच्या दिवसांमध्ये गावाला जाणार्‍याचे प्रमाण अधिक असल्याने घरे बंद असतात.
या बंद घरांचा फायदा चोरटयांनी गुड्डुराजा नगरातील एलआयसी एजंट वसंत रामकुमार पारीख हे मुलांना उन्हाळयाच्य सुट्या असल्याने राजस्थान येथे मुळगावी गेले होते.

या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश कपाटयाचे लॉकर तोडून चांदीचे नाणे तसेच 10 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला.

तसेच प्लॉट नंबर 180 मध्ये गणेश देसले यांच्या घरात वाल्मिक झुलाल पाटील हे भाडयाने राहतात. त्यांच्या नातेवाईकाकडे लग्न असल्याने ते म्हसावद येथे गेले होते.

आज सकाळी ते घरी आल्यावर त्यांना घराच्या दरवाजाला लागलेले कुलुप तुटलेले दिसले.घरात जावून बघितले तर बेडरुममधील साहित्य अस्तावस्त फेकलेले असल्याने घरात चोरी झाल्याचे समजले.

दरम्यान चोरटयांनी लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील साहित्यांची फेकाफेक केली होती. मात्र चोरटयांना घरात काहीच मिळून आले नाही.

तसेच त्यांच्या घराशेजारी जैन इरिगेशनचे राजेंद्र दंडवते यांचे घर आहे. दंडवते यांच्या आईची तब्येत ठिक नसल्याने ते आईला भेटण्यासाठी चोपडा येथे गेले असल्याने ते मुक्कामी थांबले.

दरम्यान सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजारील रहिवाश्यांनी त्यांना घरात चोरी झाल्याचे कळविले. मात्र त्यांच्या घरात देखील चोरटयांना काहीही मिळून आले नसल्याने चोरटयांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

दरम्यान राम पारीख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

*