शेतकरी 1 जुनपासून संपावर

0
जळगाव / राज्यासह जिल्ह्यात दिवसेंदिवस शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रमाण वाढत असून केंद्र व राज्य सरकार कोणतेच ठोस पाऊल उचलत नसल्याचे दिसत आहे.
शेतमालाला भाव मिळत नसल्याने तसेच खत किटनाशांकाच्या दरावर नसलेले नियंत्रण, कर्ज आदी समस्यांनी शेतकरी ग्रासलेला आहे.
त्यामुळे शेतकरी तसेच विविध शेतकरी संघटनांनी संपावर जाण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील शेतकरी 1 जून पासून संपावर जाणार असल्याची माहिती किसान क्रांती कृती समितीचे सदस्य एस. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेती मालाचा उत्पादन करण्याचा खर्च वाढला परंतू तेवढे माला भाव देखील मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांवर अवाजवी विज बिल दिले जात आहे. खत-कीटकनाशक औषध कंपन्या वाजवी भाव घेवून शेतकर्‍यांना लुटत आहे.

तसेच सरकारचे फसवे पत धोरणाने शेतकरी आत्महत्या करत आहे, आयात निर्यात धोरणामुळे शेतमालाचे भाव पडत असून त्यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळावा तसेच शेतकर्‍यांचे सर्व कर्ज माफ करावे, सर्व विज बिल माफ करून कमी दरात विज पुरवठा करावा, ठिबंकावर अनुदान, दुधाला 50 रुपये भाव द्यावा, खत- किटनाशकांच्या भावावर नियंत्रण ठेवावे, पिक विमा योजना लागू करावे, शेतमालाच्या भावासाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा.

यासाठी शेतकरी व विविध शेतकरी संघटनांनी राज्यात संप पुकारला आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी संपात सहभागी होण्याची तयारी दर्शवली असून कृती समितीतर्फे बैठक घेतल्या आहेत.

23 ते 30 मे पर्यंत सर्व तालुक्यामध्ये संपाबाबत निवेदन देण्यात येणार आहे. दि 1 जून पासून संप पुकारून शेतकर्‍यांनी घरापुरतेच धान्य पिकवावे, बाजारात आपला शेतमाल भाव विकू नये, शहरात न नेता गावातच विकावे तसेच तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करून प्रशासनाला निवेदन हे दिले जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*