अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढणार्‍या तिघांना पोलीस कोठडी

0
ठाणे / दुकानातून चोरून चकली खाल्ल्याने दोन मुलांची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याप्रकरणी उल्हासनगरातील पोलिसांनी दुकानदार आणि त्याच्या दोन मुलांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची माहिती अशी की, शनिवारी सकाळी साडे 10 च्या सुमारास उल्हासनगरातील कॅम्प नं. 5 मधील महात्मा फुलेनगर परिसरात मेहमुद जुबेखा पठाण (69) दुकान आहे. राम (9) व शाम (8) यांनी (नाव बदलेले) खेळताना चिकली चोरून ते खात बसले होते.
त्यावेळी दुकानदार मेहमुद पठाण यांनी त्या दोन्ही मुलांना चकली खाताना पकडले. ते दोघेही अनुसुचित जातीचे असल्याचा राग मनात धरून मेहमुद व त्यांची 2 मुले इरफान पठाण, तौकल उर्फ सलिम पठाण या तिघांनी राम व शाम या दोघांना प्रथम बेदाम मारहाण केली.
त्यानंतर त्या दोन्ही मुलांची अर्ध टक्कल केले, इतक्यावरच ते तिघे थांबले नाही, तर त्यांनी त्या लहान मुलांच्या अंगावरील कपडे काढून त्या दोघांनाही नग्न केले.

त्यानंतर त्या दोघांच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांची गल्लीबोळ्यातून धिंड काढली. हा सर्व प्रकार जवळपास दीड तास सुरू होता.

मात्र परिसरातील नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्या तिघांनी त्या दोन्ही मुलांचे मोबाईलद्वारे व्हिडिओ रकॉर्डिंगकरून तो व्हिडिओ व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून व्हायरलही केले.

या घटनेमुळे प्रेमनगर टेकडी परिसरात संतापाचे वातावरण पसरले होते.

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात मेहमुद पठाण व त्याची 2 मुले इरफान पठाण, तौकल उर्फ सलिम पठाण या तिघांविरूध्द कलम 355, 500, 323, 504, 34 सह अनुसुचित जाती-जमाती, अत्याचार,प्रतिबंध कायदा कलम 3(1)(ड)(इ)(आर) सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 11 (2), 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली.

तिघांनाही न्यायालयात हाजर केले असता 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक कौराती करत आहेत.

दरम्यान तिघांही आरोपींना पुढील तारखेला जामीन मिळू नये, म्हणून विविध राजकीय पक्षाच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

*