शाळांमध्ये आता पाच दिवसांचा आठवडा ?

0
मुंबई / राज्यातल्या सर्व शाळांमध्ये आता पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्याकडे तसा प्रस्ताव शिक्षण खात्यानं पाठवलाय.
माहितीच्या अधिकारात ही माहिती सामान्य प्रशासन विभागानं दिलीय. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर राज्यतल्या जिल्हा परिषदेसह सर्व शाळांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू होणार.

त्यामुळं मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

पाच दिवसांच्या आठवड्याची सक्ती करावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी केली आहे. त्याआधारावर हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय.

LEAVE A REPLY

*