प्रस्थापितांनी नवोदितांच्या लिखाणाची देखील दखल घ्यावी – नागनाथ कोत्तापल्ले

0
पुणे / ग—ामीण भागात अनेक नवोदित कवी, लेखक आपल्या अनुभवांना शब्दरुप देऊन व्यक्त होत आहेत. पंरतू त्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांचे साहित्यभान वाढीस लागत नसल्याची खंत व्यक्त करून प्रस्थापितांनी नवोदितांच्या लिखाणाची देखील दखल घ्यावी, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली.
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्यविभागतर्फे आयोजीत राज्यस्तरीय मराठी गझल कार्यशाळेचे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कोत्तापल्ले बोलत होते.

ज्येष्ठ गझलकार चंद्रशेखर सानेकर यांनी गझलस्र—ाट सुरेश भट यांच्या प्रतिमेसमोर भटांचीच एक गझल सादर करुन अनोख्या पद्धतीने या कार्यशाळेचे उद्घाटन केले.

या कार्यशाळेत संपूर्ण राज्यातून अनेक गझलप्रेमींनी हजेरी लावली.

यावेळी बोलताना नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले की, साहित्य क्षेत्रातील प्रस्थापितांनी नवोदितांच्या मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी. ज्याद्वारे ग—ामीण भागातील अनुभव देखील साहित्यातून पुढे येतील.

जो घटक आता लिहू पाहतो आहे, तो अनेक वर्षे दबले गेला आहे. पिढ्यानपिढ्या त्याला काहीतरी सांगायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे. त्यांच्या अनुभवांची, भाव-भावनांची आजवर कोणी दखलच घेतली नाही.

ग—ामीण नवसाहित्यकारांनीदेखील त्यांचे साहित्य केवळ सामाजीक माध्यमांवर न टाकता प्रतिष्ठित नियतकालिकांमधून प्रसिद्धीस द्यावे, जेणेकरुन त्यात काही त्रुटी असल्यास त्यांना योग्यवेळी मार्गदर्शन मिळू शकेल.

केवळ प्रोत्साहन न मिळाल्याने अनेक प्रतिभावंत त्यांची प्रतिभा मांडण्यापासून वंचित राहिले. हिर्‍याला योग्यवेळी पैलू पाडले गेले तरच तो अंगठीत जागा मिळवतो, नाहीतर तो त्या खाणीतच अडकून पडतो, असा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी बोलताना चंद्रशेखर सानेकर म्हणाले की, गझल हा साहित्य प्रकार अस्सल भारतीय की परकीय हा चर्चेचा विषय आहे. एकवेळ आपण तो परकीय साहित्य प्रकार आहे असे मानले तरी त्याचे भारतीयकरण मात्र नक्कीच झाले आहे.

गझल लिहण्यासाठीचे एक तंत्र आहे, पंरतू गझल ही तंत्राच्या आधारेच लिहता येते हा गैरसमज आहे. मी स्वत: गझल लिहतांना तंत्राला केंद्रीय स्थानी ठेवत नाही. तंत्राबद्दल मी स्वत: मबेफिकीरफ असतो.

रुपाली अवचरे यांनी या कार्यशाळेच्या उद्धाटन सत्राचे सूत्रसंचालन केले, तर रंगत संगत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले.

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रानंतर कार्यशाळेचे सूत्रधार आणि मुख्य समन्वयक भूषण कटककर यांनी गझलाच्या इतिहासापासून ते गझलेची जमीन, तिचे महत्त्व आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

*