प्रचारतोफा थंडावल्या : भिवंडीत कोण मारणार मुसंडी

0
ठाणे / भिवंडी शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेना, भाजप, काँग—ेस, समाजवादी, राष्ट्रवादी, कोणार्क विकास आघाडी, काँग—ेस, बसप आदी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधण्यासाठी प्रचार रॅली, प्रत्यक्ष भेटीगाठी करून मतदानाचे आवाहन केले.
शहरातील खड्डेमय रस्ते व ठिकठिकाणी पडलेले कचर्‍याचे ढीग त्यामुळे निर्माण होणारा दुर्गंधीचा वास घेत हे उमेदवार गल्लीबोळातून आपल्या पदाधिकार्‍यांसोबत मतदारांच्या घरामध्ये जात मतदारांना लुभावत होते.
भिवंडी महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या बुधवारी (24 मे) मतदान होत आहे. अखेरच्या टप्यात मतदारांनी आपल्याच बाजूने मतदान करावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवार सतर्क झाले आहेत.

महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सोमवार सायंकाळी 5 वा. संपुष्टात आल्याने रात्री उशिरापर्यंत उमेदवारांनी व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन 15 ते 20 कार्यकर्त्यांचा गट तयार करून प्रभागामध्ये प्रचारासाठी रवाना करीत होते.

त्यामुळे शहरातील शांतीनगर, कामतघर, मानसरोवर, कल्याणरोड, शास्त्रीनगर ,पद्मानगर, प्रभुआळी , गोकुळनगर, म्हाडा कॉलनी, अशोक नगर, गोपाळ नगर, कोंबडपाडा ,दर्गारोड, सौदागर मोहल्ला, गायत्री नगर, नागांव आदी विविध प्रभाग व कामगार वस्तीमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांनी मतदारांशी संपर्क करून संवाद साधला.

यावेळी मतदारांनी परिसरातील रोजचा कचरा उचलला जात नाही. जंतुनाशक औषध फवारणी होत नाही. त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

रस्ते खराब झाले आहेत. शौचालयांची दुरावस्था झाली आहे. अशा विविध तक्रारी मतदारांनी उमेदवार व नगरसेवकांकडे मांडल्यामुळे प्रचारकर्ते अडचणीत येत होते.

भिवंडीतील 23 प्रभागांसाठी 560 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत भिवंडी पालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे.

भिवंडी पालिकेची निवडणूक शांततेत व शिस्तबद्धरीत्या पार पडावी यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलली आहेत.

या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 8 वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.

LEAVE A REPLY

*