जिल्हा मार्केटींग कार्यालयाची काँग्रेसकडून तोडफोड

0
बुलडाणा / जिल्हयात अजुनही अनेक केंद्रांवर तूर तशीच पडून आहे. सरकारचे उदासीन धोरण व कर्मचार्‍यांमुळे शेतकर्‍यांची तूर मोजण्यास विलंब होत आहे.
याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आणि आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी जिल्हा मार्केटींग अधिकार्‍यांच्या सोमवारी तोडफोड केली.

जिल्हयातील शेतकर्‍यांची प्रत्येक तूर खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल तूर मोजमापाशिवाय उघडयावर पडून आहे.

तूर खरेदीला 31 मे पर्यंतची मुदतवाढ मिळाली असली, तरी आतापर्यंत 22 एप्रिल पर्यंतची तुरही खरेदी करण्यात आलेली नाही.

शेतकर्‍यांनी फेब—ुवारी महिन्यापासून केंद्रावर तूर आणलेली आहे. मात्र, तूर खरेदीची गती संथ आहे. अशा कासव गतीने अजुनही एक महिना खरेदी होऊ शकत नाही.

त्यामुळेच भगीरथ कारखान्यातील कॅम्पसमध्ये असलेल्या जिल्हा मार्केटिंग कार्यालयात आ. राहुल बोंद्रे पोहोचले. यावेळी संबंधित वरीष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी कर्मचारी वर्गास तूर खरेदी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या? अशी विचारणा केली.

कर्मचारी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ न शकल्याने सोबतचे शेतकरी व कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली.

पावसात तुर भिजल्यास बळीराजाचे नुकसान
मोसमी वारे अंदमान मध्ये पोहचले आहेत. ते केव्हाही येथे धडकु शकतात. अशावेळी पाउस पडून केंद्रावरील तुर जर ओली झाली तर, मग मात्र बळीराजाचे नुकसान होणार आहे.

याच तुरीच्या भरवशावर खरीप हंगामाचे पिक पेरणीचे नियोजन शेतकर्‍यांनी केले आहे. जर तुर मोजल्या गेली नाही तर त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा भावनाही या वेळी शेतकर्‍यांनी मांडल्या.

 

LEAVE A REPLY

*