भारताची पहिली चाल यशस्वी: अ‍ॅड. उज्ज्वल निकम

0

जळगाव / पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या कुलभूषण यांच्या बचावासाठी भारतानं खेळलेली पहिली खेळी यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

असं असलं तरी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निर्णय पाकिस्तान अमान्य करण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

उज्ज्वल निकम म्हणाले, फकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती असली, तरी या निकालाद्वारे एक बाजू स्पष्ट झालेली आहे, की भारताचं जे म्हणणं होतं, कुलभूषण जाधव हे अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या खासगी व्यवसायानिमित्त गेले असताना, पाकिस्तानमध्ये त्यांना पळवण्यात आलं.

आणि तिथल्या लष्करी न्यायालयाने त्यांना कोणतीही बचावाची संधी न देता, मानवी हक्कांचं उल्लंघन करुन, घिसाडघाईने फाशीची शिक्षा सुनावली.

एवढंच नाही या शिक्षेनंतरही त्यांना कोणासही भेटण्यास मज्जाव केला, याबाबतीत आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात ही बाजू जोरदारपणे मांडून, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं समाधान झालं, त्यामुळेत त्यांच्या फाशीला स्थगिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*