पुरंदरच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळास ग्रामस्थांचा  विरोध कायम

0

पुणे / पुरंदर तालुक्यातील पारगाव-खानवडी भागातील नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्वेक्षणानंतरही बाधित गावातील ग्रामस्थांचा  विरोध कायम आहे.

विमानतळाच्या सततच्या दडपणामुळे आत्महत्या केलेल्या शंकर मेमाणे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.

विमानतळ होऊ देणार नाही, असे म्हणत ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवला आहे.

यावेळी विमानतळाला विरोध करण्यासाठी सासवड येथील तहसील कार्यालयावर बाधित गावांतील ग्रामस्थांनी सोमवार मोर्चा काढला होता. विमानतळासाठी एक इंचही जागा न देण्याचा निर्धार या वेळी  व्यक्त केला.

पुरंदर तालुक्यातील नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुरवातीपासून ते आजतागायत विरोध कायम आहे.

सासवड येथील तहसील कचेरीवर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत ’एकच गोष्ट खरी आम्हाला आमची शेती बरी’, ’जमीन देण्यास आमचा विरोध’ असे फलक घेऊन ग—ामस्थ मोर्चात सहभागी झाले होते.

विमानतळासाठी लागणार्‍या जागेचे सर्वेषणही पूर्ण झालेले आहे. येथील शेतकरी दुग्ध आणि कुकुटपालन हे शेतीपूरक व्यवसाय करतात, तसेच बागायती जमिनी गेल्यास शेतकरी उध्वस्त होईल. त्यामुळे आम्हाला कोणतेही पॅकेज नको असेही शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

हजारो गावकरी विमानतळासाठी जागा न देण्याच्या भूमिकेवर ठाम असले तरी आजच्या मोर्चात आधीच्या मोर्चापेक्षा शेतकर्‍यांची संख्या कमी होती. त्यामुळे या विमानतळाचे भविष्यात नेमके काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*