अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला पोलीस कोठडी

0

नांदेड / अल्पवयीन तरुणीवर 3 वर्षांपासून बलात्कार करणार्‍या महेंद्र भगवान पवळे या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.

त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, जिल्हा न्यायाधिश जी. ओ.अग्रवाल यांनी पोलीस कोठडी ठोठावली आहे.

हनुमानगड वसरणी येथे भाडेकरू म्हणून राहणार्‍या तरुणीला घरमालकाच्या मुलाने प्रेमाचे आमिष दिले.

त्यानंतर त्याने तिच्यावर सतत 3 वर्षे अत्याचार केले. दरम्यान तिचे घर बदलले तरी, पण तो तिच्यावर अत्याचार करतच होता.

अखेर तिने 3 वर्षांनंतर तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण  पोलिसांनी महेंद्र भगवान पवळे व त्याची आई जनाबाई आणि भाऊ प्रवेश पवळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपी महेंद्र भगवान पवळे यास न्यायालयात हजर केले असता . न्यायाधीश अग्रवाल यांनी महेंद्रला पोलीस कोठडी ठोठावली आहे.

LEAVE A REPLY

*