निलक्रांती योजनेतंर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

0

बुलडाणा / केंद्र शासनाच्या निलक्रांती योजनेतंर्गत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या मच्छिमार सभासद, मत्स्यव्यावसायिक, मत्स्योद्योजक तसेच मत्स्यप्रेमी, शेततळीधारक मत्स्यकास्तकारांसाठी, शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यबोटूकली निर्मिती करून मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शनपर एकदिवसीय कार्यशाळा व चर्चासत्र नुकतेच प्रशासकीय इमारतीच्या सभागृतहात मत्स्यव्यवसाय विकास विभागाचेवतीने आयोजित करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक उपआयुक्त शा.प गोटाफोडे, सहाय्यक आयुक्त स. ई नायकवडी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रा.रू राठोड, शशिकांत जाधव यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्ह्यातील मत्स्यकास्तकार, मत्स्योद्योजक, मत्स्यप्रेमी, खाजगी उद्योजक आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात केज कल्चर (पिंजरा पद्धत) पोर्टेबल हॅचरी (स्थलांतरीत होऊ शकणारी मत्स्यबीज निर्मिती संच) तसेच भुजलाशयीन मत्स्यव्यवसायाबाबत दृकश्राव्य साधनाद्वारे बहुमोल माहिती देण्यात आली.

तसेच दबलत्या काळात मत्स्योद्योजकांनी, व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून शेतीप्रमाणे प्राधान्याने मस्त्योत्पादन घेऊन आपला सामाजिक आर्थिक विकास करावा.

यास्तव मत्स्यव्यवसाय विभाग सर्वतोपरी सहाय्य करण्यास कटीबद्ध असून निलक्रांती योजनेतंर्गत मत्स्यव्यवसायिकांनी जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेवून सहाकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*