आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे अस्थिकलश घेवून राज्यभर दौरा

0

अमरावती / सरकारचे लक्ष वेधण्याकरिता सांगली जिल्ह्यातील विजय बालोसा जाधव हे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे अस्थिकलश घेवून राज्यभर दौरा करणार आहेत.

मुंबई येथे जाधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

राज्यभर शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असताना जाधव हे त्यांच्या दुचाकीवर सांगली, कोल्हापूर, नागपूर येथून मुंबईला जाणार आहेत.

मार्गावरील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून संपूर्ण कर्जमाफी व स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी ते करणार आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांची भेट घेवून त्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहचविणे हेच आपले या यात्रे मागील ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

अमरावती येथे त्यांनी वाघोली येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली.

LEAVE A REPLY

*