अपहारप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला पतीसह जामीन

0

ठाणे / बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासह 3 जणांच्या विरोधात 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यामुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोघांना ठाण्याच्या सत्र न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उद्योगपती राज कुंद्रा यांनी त्यांच्या पत्नी शिल्पा शेट्टी यांच्या नावाने मबेस्ट डील टीव्ही कंपनीफ स्थापना केली.

या कंपनी द्वारे विविध कंपनीचे प्रोडक्ट विक्रीचा ऑॅनलाइन शॉपिंगचा व्यवसाय सुरु केला आहे.

याच कंपनीमार्फत रवी मोहनलाल भलोटीया (वय 59) रा. गोरेगाव पूर्व, मुंबई यांचा कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरवली एमआयडीसी येथे (बेड सीट) चादरी बनविण्याचा कारखाना आहे.

या चादरी विक्री करण्यासाठी बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या सीओशी भेट होवून त्यांनी भलोटीया यांना अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा हे चित्रपट अभिनेते, अभिनेत्री या कंपनीत भागीदार असल्याचे सांगण्यात आले.

फायद्याचे आमीष दाखविण्यात आल्याने भलोटीया यांनी शिल्पा शेट्टीच्या कंपनीशी ऑॅनलाइन शॉपिंगद्वारे चादर विकण्यासाठी करारनामा केला.

त्यांना सुरवातीला चांगला व्यवसायही झाला. त्यामुळे रवी भलोटीया यांनी तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांच्या ऑॅनलाइन विक्रीसाठी कंपनीला चादरी दिल्या.

करारनाम्यानुसार चादरी विक्री झाल्यावर 15 ते 20 दिवसांत भलोटीया यांना पैसे मिळणे अपेक्षित होते.

मात्र वेळेत रक्कम न मिळाल्याने त्यांनी राज कुंद्रा यांना फोन करुन उरलेली 24 लाख 12 हजार 877 रुपयांची रक्कम मागितली.

त्यावर कुंद्रा यांनी सांगितले की, 4 महिने थांबा, कंपनी नुकसानीत असल्याने तुमचे पैसे देणे शक्य नाही. यामुळे भलोटीया यांनी 4 महिने वाट पाहिली.

त्यानंतर मात्र ते मलाड येथील कार्यालयात गेले असता. त्यांना कार्यालयाला कुलूप असल्याचे आढळून आले. त्यानंतर बेस्ट डील टीव्ही कंपनीत गेले भलोटीया यांना हाकलून देण्यात आले.

तसेच पैसे मागितल्यानंतर तर हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली. यामुळे घाबरलेल्या अवस्थेत गेली 4 महिने ते स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी चक्करा मारत होते.

यामुळे फिर्यादीने थेट ठाणे पोलीस आयुक्त कार्यलय गाठत घडलेला प्रकार पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना सांगताच त्यांनी तत्काळ कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

दोघांना ठाण्याच्या सत्र न्यायालयात अंतरीम जामीन मागितला होता. यानंतर न्यायालयाने 50-50 हजार रुपयांच्या जामिनावर त्यांना अंतरिम जमीन मंजूर केला आहे.

LEAVE A REPLY

*