पेट्रोलपंप चालकांचं पुन्हा संपाचं हत्यार

0

औरंगाबाद / राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

कमिशन वाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 10 मे रोजी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोलपंप चालकांनी घेतला आहे.

पेट्रोल वितरकांच्या ङ्गफामपेडाफ संघटनेच्या वतीने औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.

मागण्या मान्य न झाल्यास येत्या रविवार पासून साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारपासून रात्रीच्या वेळी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सध्या पेट्रोलपंप चालकांना डिझेलला प्रति लीटर एक रुपया 45 पैसे एवढे कमिशन मिळते.

या उलट पेट्रोल पंपाचा व्यवस्थापन खर्च सोयी-सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत कमी असल्याने व्यवसाय करणं कठीण जात असल्याचं पेट्रोलपंप चालकांचं म्हणणं आहे.

मागण्यांसदर्भात सरकारकडे पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचं संघटनेनं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

*