गुजरात भाजपामध्ये तिकिटावरून बंडाचे निशान

0
गांधीनगर :  गुजरातमध्ये होणार्‍या निवडणूकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली. ही यादी जाहीर झाली. यात आपले नाव असेल याची शत प्रतिशत खात्री असणार्‍यांची मात्र या यादीने गोची केली आहे. पहिल्या यादीत नाव न आल्याने अनेक इच्छूकांनी आता सहमतीने बंडाचे निशान पुकरण्याचे ठरवले आहे.

या बंडामध्ये पहिले निशान भाजपा प्रदेशाध्यक्षांनी फडकले आहे. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघ यांनी ताताकाळ पदाचा राजीनामा दिला आहे.

त्यांच्यामागोमाग भरूच जिल्हा पचांयतीचे सदस्य वल्लभ पटेल यांनीही राजीनामा दिला आहे. त्यांना अंकलेश्‍वरमधून तिकिट हवे होते. त्यांच्याऐवजी भावाला दिल्याने ते नाराज झालेत. भाजपाचे महामंत्री दशरथ पुवार, कमलेश पटेल व चैतन्य सिंह या वजनदार नेत्यांनीही राजीनामे दिले आहेत.

नव्या जबाबदार्‍या देण्याचे आश्‍वासन

दरम्यान राजीनामा देणार्‍या पदाधिकार्‍यांना नव्या जबाबदार्‍या देण्याचे आश्‍वासन देत त्यांची नाराजी दूर करण्याचा पक्षाध्यक्ष अमित शहा प्रयत्न करत आहेत. परंतू अजुनही नाराजीचा सूर तिव्रच दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*