पाणी टंचाई विरोधात शिवसेनेचा चोपडा नगरपालिकेवर मोर्चा

0
चोपडा । गेल्या 15 दिवसापासून शहराचा पाणी पुरवठा बंद झाल्याने भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.पाण्यासाठी जनते चे प्रचंड हाल होत आहे.शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होऊन जनतेचे हाल थांबवावे यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने आज दि.14 रोजी चोपडा नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला.मोर्चेकर्‍यांचे निवेदन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी स्वीकारले. गुळ धरणातून शहरासाठी आवर्तन सोडण्यात आले असून, यापुढे जुलै महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन करून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी तडवी यांनी बोलतांना मोर्चेकर्‍यांना दिले. यावेळी नगराध्यक्षा मनीषा चौधरी, उपनगराध्यक्षा सीमा जैन उपस्थित होते.

आज सकाळी 10 वाजता शहरातील गांधी चौकातून मोर्च्याला सुरुवात होऊन मेनरोड वरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,शिवाजी महाराज चौकातून थेट नगरपालिकेवर मोर्चा धडकला.मोर्च्यात शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,गटनेते महेश उर्फ भैय्या पवार, आरोग्य सभापती मिनाबाई शिरसाठ,नगरसेवक राजाराम पाटील,किशोर चौधरी,प्रकाश पाटील, लताबाई पाटील,महेंद्र धनगर,मनीषा जैस्वाल, संध्या महाजन,तसेच शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते दिपकसिंग जोहरी,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील,अमृतराज सचदेव, प्रा.शरद पाटील, राजेंद्र जैस्वाल,रहीम बागवान, काझी,दीपक चौधरी,प्रवीण जैन,सुनील बरडीया, डॉ.रोहन पाटील,धीरज गुजराथी,यांचेसह शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्च्यात नगरपालिका प्रशासना विरोधात घोषणा देण्यात आल्या.विशेष म्हणजे आजच्या शिवसेनेच्या पाणी टंचाई विरोधातील मोर्च्याला महिलांची उपस्थित लक्षणीय होती. याप्रसंगी प्रा.शरद पाटील, अमृतराज सचदेव,रहीम बागवान,महेंद्र धनगर आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी एपीआय सुजित ठाकरे, पो.कॉ. विश्वास बोरसे आदी कर्मचार्‍यांनी बंदोबस्त ठेवला.

LEAVE A REPLY

*