मुंबईच्या मान्सुन मॅरेथॉनमध्ये जळगावातील दिलीप धांडे, योगेश चौधरींचा सहभाग

0
जळगाव |  प्रतिनिधी  :  मुंबई येथील मान्सून मॅरेथॉनमध्ये जळगावातील रनर्स ग्रुपचे सदस्य  दिलीप धांडे व योगेश चौधरी यांनी चौथा क्रमांक पटकाविला.

मुबंई येथे नुकतीच मान्सून मॅरेथॉन पार पडली. रनर्स ग्रुपचे सदस्य योगेश चौधरी (३६मिनिट), अजित महाजन (७१मिनिट), उमेश महाजन (७१मिनिट), ज्ञानेश्वर बढे (७२मिनिट), प्रा.शशांक झोपे (७०मिनिट), संजय मोती (४९मिनिट),आशिष पाटील (६९मिनिट), वैभव लिंबडा (मिनिट), नंदकुमार पाटील (६२मिनिट) यांनी ही १०की.मी.ची स्पर्धा पूर्ण केली.

तसेच या मॅरेथॉन स्पर्धेत कर्नल दिलीप पांडे हे पुणे येथील निओ व्हिजन स्पर्धेत १० की.मी ची रन ५१ मिनिटात पूर्ण करून  या स्पर्धेतून चौथे आले. पवन गोंधुळे व डॉ.प्रशांत बडगुजर यांनी मुंबई येथील मीरा भाईंंदर मॅरेथॉन ची १० की.मी.रन ६० व ७४ मिनिटात पूर्ण केली.

मुंबई-पुणे महामार्गावर मॅरेथॉन स्पर्धा होत असते. यामध्ये रनर्स ग्रुपचे ऍड. सागर चित्रे (२तास१८मि.), सचिन महाजन (२तास २३मि.), डॉ. नितीन पाटील (२तास ५०मि.), गितेश मुंदडा (२तास ३२मि.), डॉ.तुषार उपाध्ये(१०कि.मी.७७मि), यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत २१की.मी.ची हाप मॅरेथॉन पुर्ण केली.

याप्रकारच्या विविध प्रकारच्या मॅरेथॉन पुर्ण झाल्यानंतर रर्नसलला आपल्या वयाच्या गटानूसार त्यांनी ठराविक वेळेत मॅरेथॉन पूर्ण केल्यास मुंबई येथील जगातील पाचवी मोठी मॅरेथॉन एस.सी.एम.एम. २०१८ साठी स्पर्धक पात्र ठरत असतात.

यात जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य यशस्वी झाले आहेत. या स्पर्धकांना किरण बच्छाव, विक्रांत सराफ, निलेश भांडारकर, अविनाश महाजन, नरेंद्रसिंग सोलंकी, डॉ.विवेक पाटील, डॉ.प्रशांत देशमुख व रनर्स ग्रुपच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*