पाटणादेवी येथे स्थानिक पर्यटक व प्रेमीयुगलांमुळे भाविकांना भुर्दंड

0

चाळीसगाव |  प्रतिनिधी :  महाराष्ट्रातील प्राचिन श्रध्दास्थान असलेले तिर्थक्षेत्र पाटणादेवी येथील चंडीकामातेच्या दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी राज्यभरातून दररोज शेकडो भाविक येतात.

परंतू सध्या चाळीसगाव परिसरातील स्थानिक दारु रिचवणारे पर्यटक व प्रेमीयुगामुळे खर्‍या भाविकांना वनविभागाच्या करवसुलीचा आर्थिक भुरदंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरेलेली आहे.

श्रावणाच्या सुरुवातील पासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत दरवर्षी तालुक्यासह राज्यभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पाटणादेवी येथे मोठ्या प्रमाणात भाविक नवस फेडण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. तसेच येथील निसर्ग सौर्द्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी अनेक हौशी पर्यटक येतात.

तालुक्यातही अनेक पर्यटक फक्त मज्जा करण्यासाठी पाटणादेवी येथे जातात. जवळपास दरवर्षी येथे काही अतिउत्साही पर्यटकाचा पैकी एक दोन जणांचा जिव केदार कुंड व पितळखोरे येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून गेल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. यंदाही गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वीच देखील अशाचा हौशी पर्यटकांचा धबधबत्यात बुडून मृत्यू झाला आहे.

त्यामुळे संतापलेल्या वनविभागाने दि.३० जुलै २०१७ पासुन पाटणादेवी येथे येणार्‍या प्रत्येक भाविकाकडून पावतीच्या नावाखाली आर्थिक वसुली चालू केली आहे. त्यामुळे प्रमाणिक भाविकाना नाहक आर्थिक भुरदंड पडत आहे. भाविकांना आर्थिक भुरदंड पाडण्यामागचे खरे कारण, चाळीसगाव परिसरातील स्थानिक पर्यटक व प्रेमीयुगल आहे. पाटणादेवी जंगल हे आता स्थानिक पर्यटकांचा जणू दारु पिण्याचे नैसर्गिक हकाचे ठिकाण झाले आहे.

कारण येथे दररोज मोठ्या परिसरातील पर्यटक फक्त दारु पिण्याच आनंद घेण्यासाठी जातात. यासाठी छुप्या पध्दतीने ते दारु घेऊन जंगल क्षेत्रात जातात व त्याठिकाणी मनसोक्त दारु रिचवतात, आणि मग दारु पिल्यानतंर तेथे रिकाम्या बाटल्या फोडतात, अनेक रिकामे उद्योग करतात, यामुळे अनेकाना आपल्या जिवाशी देखील मुकावे लागले आहे.

परवा देखील एका फायनान्स कंपनीच्या कर्मचारी व आधिकारी पाटणादेवी येथे नवसाच्या नावाखाली आहे होते. त्याच्याकडे वनविभागाच्या कर्मचार्‍यांना बियरच्या बाटलीचे व इतर विदेशी दारुचे बॉक्सच्या बॉक्स सापडले आहे. परंतू वनविभागाने याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, किवा ह्या गोष्टीची कुणालीही कानोकाणी खबर सुध्दा होऊ दिली नाही.

यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी चिरीमिरी घेऊन गप्प राहण्याची भूमिका घेतली. तर दुसरीकडे पाटणादेवी जंगल क्षेत्र हे प्रेमीयुगासाठी जनू लवर पॉंईट असल्यासारखे आहे. येथे दररोज कॉलेजच्या वेळात अनेक प्रेमीयुगल दिसतात, आणि याठिकाणी नको ते उद्योग करतात.

चोरी छुपे आलेले प्रेमी युगल मग येथील वनविभागाकडून नेमण्यात आलेल्या कॉन्ट्रक तत्वावरील कर्मचार्‍यांना मॅनेज करतात, त्याना १००, २०० ची नोट हातावर टेकवतात आणि सहज जंगल क्षेत्रात प्रवेश मिळवतात.

अशा प्रकारांमुळेचे सद्या वनविभागाकडून जंगल क्षेत्रात प्रत्येकाकडून प्रवेशाबाबतची पार्वतीच्या नावाखाली आर्थिक वसूली केली जात आहे. यामुळे खर्‍या भाविकांमात्र नाहक आर्थिक भुरदंड बसत आहे. यागंभीर प्रकारेकडे आता वनविभागाच्या वरिष्ठ आधिकार्‍यांनीच दखळ घेतली पाहिजे तसेच दोषी असलेेल्यावर कारवाई देखील केली पाहिजे.

सीसीटीव्ही व सूचना फलक बसविण्याची गरज

पाटणादेवी जंगल क्षेत्रात रिकामे उद्योग करणार्‍यांवर आळा घालण्यासाठी, प्रवेशव्दार तसेच जंगल परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर बसविण्याची गरज आहे. तसेच प्रवेशव्दारा जवळच मोठ्या अक्षरात जंगल क्षेत्रातील पाळावयचे नियम व होणार्‍या परिणांबाबत सूचना फळक लावले पाहिजे.

तसेच ठिकठिकाणी स्वयंम सेवकाची नेमणूक करुन, पर्यटन व इतर गोष्टींबाबत जगजागृती व माहिती भाविकांना दिली पाहिजे. यामुळे जंगलक्षेत्राची होणारी हानी टळणार आहे.

LEAVE A REPLY

*