सदाभाऊंची हकालपट्टी

0

पुणे । दि. 7 प्रतिनिधी-राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांबद्दलच्या त्यांच्या निष्ठा संशयास्पद असल्याचे कारण देत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपप्रणीत एनडीए आघाडीत सहभागी झाल्यानंतर पक्षाच्या कोट्यातून खोत यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते.

मात्र सरकारमध्ये गेल्यानंतर ते संघटनेपासून दूर गेले. त्यातून संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी त्यांचे मतभेद झाले होते.

कर्जमुक्तीसाठी राज्यातील शेतकर्‍यांनी काढलेल्या मोर्चाच्या वेळी खोत यांनी सरकारला अनुकूल भूमिका घेतल्याने हे मतभेद आणखी तीव्र झाले.

तेव्हापासून खोत यांच्या हकालपट्टीची चर्चा होती. मात्र राजू शेट्टी यांनी थेट कोणताही निर्णय न घेता चार सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली.

 

LEAVE A REPLY

*