Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

प्राध्यापकांना पीएचडी, एम.फील साठी प्रोत्साहनपर वेतनवाढ, ओरिएंन्टेशनसाठी मिळणार मुदतवाढ

Share
जळगाव :  अखिल भारतीय राष्ट्रीय शौक्षिक महासंघ प्रणित एन मुक्ता या संघटनेस  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी  चर्चेसाठी निमंत्रित केले होते. या बैठकीत प्राध्यापकांच्या मागण्यांना शिक्षणमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी शिक्षणविभागाचे सचिव सिध्दार्थ खरात, अप्पर सचिव विजय साबळे, सहसंचालक उच्च शिक्षण विभाग, पुणे विभाग आदी उपस्थित होते.
बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. सातव्या वेतन आयोगकाचा महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 8 मार्च 2019 चा शासननिर्णय काढल्यानंतर अचानक शासनाने दिनांक 10 मे, 2019 रोजी पुन्हा श्ुध्दीपत्रक काढले त्यात अनेक बाबी या अन्यायकारक असून त्यात शिक्षकांचे नाहक नुकसान होत होते. याबाबत अखिल भारतीय राष्ट्रीय शौक्षिक महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या शिष्ट मंडळाने काल दिनांक 17 मे रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली.
या बैठकीत अखिल भारतीय राष्ट्रीय शौक्षिक महासंघ संलग्नित प्रत्येक विद्यापीठातील स्थानिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभरातील शिक्षकांचा रोष त्यांच्या निदर्शनास आणून दिला आणि त्यावर तोडगा न निघाल्यास राज्यस्तरीय आंदोलनाचा इशारा देखील दिला. त्यावर शासनाने संघटनेचे म्हणणे ऐकुन घेत पुढील आश्वासने दिली.
  •  भारत सरकार यांचे दिनांक 18 जुलौ, 2018 च्या राजपत्रातील तरतुदीनुसार पीएच.डी, एम.फील साठी प्रोत्साहनपर वेतनवाढ तसेच रिफ्रेशर/ ओरिएन्टेशनसाठी मुदतवाढ देण्याबाबत राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, शासनाचे प्रतिनिधी व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी नेमून कार्यवाही करण्यात येईल.
  • कॅसचे फायदे हे मुलाखतीच्या दिनांकापासून लागू करणेसाठी जे प्राध्यापक लाभ मिळणेस प्राप्त आहेत त्यांनी प्राचार्य आणि विद्यापीठाकडे अर्ज केल्यानंतर पुढील सहा महिन्यात त्यांचे कॅस करण्याची जबाबदारी प्राचार्य आणि विद्यापीठांची राहील तसे न झाल्यास त्यादिवसापासून संबंधित प्राध्यापकांना कॅस लागू होईल. आणि ज्यांनी कॅस प्रक्रीया करण्यास विलंब लावला त्या विद्यापीठातील संबंधित अधिकारी आणि प्राचार्य यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल.
  • 10 मे, 2019 शासनाच्या शुध्दीपत्रकात काढून टाकलेले उपप्राचार्य पदाची निर्मिती युजीसीच्या निर्देशानुसार कायम करण्यात येईल.
  • केंद्र शासनाने 200 बिंदूनामावली आरक्षण, नेट-सेट आणि 71 दिवसांच्या प्रलंबित वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्याचे सूचक वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
सदर बौठकीला अखिल भारतीय राष्ट्रीय शौक्षिक महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा.अनिल कुलकर्णी, महासचिव प्रा.शेखर चंद्रात्रे, नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा कल्पनाताई पांडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (एनमुक्ता) चे अध्यक्ष प्रा.नितीन बारी, महासचिव डॉ.अविनाश बडगुजर, मुंबई विद्यापीठातील प्रा.वौभव नरवडे, महासचिव प्रा.सुभाष आठवले, नांदेड विद्यापीठाचे प्रा.संतराम मुंढे, गोंडवाना विद्यापीठातील डॉ.विवेक जोशी तसेच अन्य 11 विद्यापीठातील प्रतिनिधी हजर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!