जीएसटीपोटी मनपाला 8 कोटी 74 लाख अनुदान

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-देशभरात 1 जुलै पासून जीएसटी लागू झाली आहे. एलबीटी बंद झाल्यामुळे जीएसटीपोटी शासनाकडून 8 कोटी 74 लाखाचे अनुदान मंजूर झाले आहे. याबाबतचे पत्र मनपा प्रशासनाला प्राप्त झाले.

राज्यातील महानगरपालिकांमध्ये स्थानिक संस्था करप्रणाली लागू करण्यात आली होती. परंतु ही करप्रणाली बंद केल्यानंतर महापालिकेचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून शासनाकडून अनुदान दिले जात होते.

परंतु आता सर्व कर प्रणाली रद्द करुन देशरात दि.1 जुलैपासून जीएसटी ही करप्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एलबीटी ऐवजी जीएसटीचे अनुदान दिले जात आहे.

ऑगस्ट महिन्यासाठी जीएसटीपोटी 8 कोटी 74 लाखाचे अनुदान मंजूर झाले असून याबाबतचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे.

मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे गेल्या दोन महिन्याचे वेतन थकले आहे. जीएसटीपोटी मिळालेल्या अनुदानामुळे आता महापालिकेला दिलासा मिळाला आहे.

 

LEAVE A REPLY

*