मॉर्निंग वॉकला जाणार्‍या वृध्देची 10 ग्रॅमची मंगलपोत लंपास

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-शहरातील शिवकॉलनी परिसरातील शंभरफुटी रस्त्यावर मॉर्निंग वॉकला जाणार्‍या वृध्द महिलोचा पाठलाग करून एका चोरटयाने महिलेच्या गळयातील 10 ग्रॅमची पोत हिसकावून नेल्याची घटना सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वृध्द महिलेने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत प्रत्यक्ष महिलेने दिलेली माहिती अशी की, शिवकॉलनीमधील लिलाबाई रामदास पाटील हया सकाळी नेहमीप्रमाणे शंभरफुटी रस्त्याकडे जाणार्‍या मोकळया जागेत मॉनिर्ंग वॉकला जात असताना एका तरुणाने त्यांचा पाठलाग करायला सुरवात केली.

दरम्यान रस्त्यावर गर्दी नसल्याचा फायदा घेत त्या चोरटयांने लिलाबाई यांच्या गळातील मंगलपोत हिसकावली. याचवेळी मंगलपोत तुटल्याने काही मणी जमीनीवर पडले.

यावेळी चोरटयाने जमीनीवर मणी देखील उचलून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी लिलाबाई यांनी मोठया हिंमतीने या चोरटयास पकडले. व आरडाओरड करण्यास सुरवात केली. याचवेळी या चोरटयांने पुन्हा लिलाबाईच्या हाताला झटका देवून पळून जाण्यास यशस्वी झाला.

पोलिसांनी तपासले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज
लिलाबाई पाटील यांनी घटनेबाबत तात्काळ रामानंद नगर पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरटा महिलेच्या घरापासून पाठलाग करीत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी परिसरात चोरटयांचा शोध घेतला. परंतू चोरटा मिळून आला नाही. लिलाबाई यांनी याबाबत रामानंद नगर पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*