रक्षाबंधन : अतुट नात्याचा बंध..!

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-‘रक्षाबंधन’निमित्त शाळांमध्ये विद्यार्थींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून भावा-बहिणीच्या अतूट नात्याचे दर्शन घडविले. तसेच वृक्षाला राखी बांधून वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम पूर्व प्राथमिक विभागामध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण व ‘ग्रीन कलर डे’ साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, सविता कुळकर्णी, योगिता पाटील यांंनी रक्षाबंधन या दिवसाचे महत्व मुलांना सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांची हिरव्या रंगाची संकल्पना स्पष्य होण्यासाठी ‘ग्रीन कलर डे’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक शिक्षिकांनी आणलेल्या हिरव्या रंगाच्या विविध वस्तुची सुरेख मांडणी करण्यात आली होती. जयमाला चौधरी यांनी सर्व हिरव्या रंगाच्या वस्तुंची माहिती दिली. यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, समन्वयिका सविता कुळकर्णी यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

सनी किड्स
सनी किडस भोईटे नगर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी चिमुकल्यांनी एकमेकांना राखी बांधून तसेच परिसरातील विवधि फुल झाडांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी संचालिका भाग्यश्री महाजन यांनी रक्षाबंधन या सणाविषयीचे माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुशीला महाजन यांनी बहिण-भाऊ यांच्यातील निस्वार्थी प्रेमाची व भावाने बहिणीचे संरक्षण करण्याची तसेच पर्यावरणचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा दिली. सुत्रसंचलन सन्मुख महाजन यांनी केले. तर आभार भाग्यश्री महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी सन्मुख महाजन, गौरी महाजन, भाविका पाटील यांनी परिश्रम घेतले.

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन
मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनतर्फे बालनिरीक्षण गृह (रिमांड होम) मुलासोबत बहिण भावाचे पवित्र सण ‘रक्षाबंधन’ साजरा करण्यात आला. त्यानंतर मुलांना फाऊंडेशनतफे दैनंदिन लागणार्‍या वस्तू वाटप करण्यात आले. तसेच मुलांना पवित्र सण ‘रक्षाबंधन’बाबत माहिती देण्यात आली. यावेळी आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख, सलीम इनामदार, प्रविण पाटील, गिरीश व्यास, गणेश महाले, सुनिल पाटील, जमिल शेख, रहुप भाई, अ‍ॅड.विक्रम परीहार, निरीक्षक सारीका मेटकर होते. आभार फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी मानले.

शिवधाम मंदिर
शिवधाम मंदिर ट्रस्टतर्फे श्रावण मासातील तिसरा सोमवार व रक्षाबंधनाचे औचित्य साधून शिवधाम मंदिर ट्रस्टतर्फे स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, वृक्षारोपन, वृक्ष संवर्धन, कॅन्सर करुया कॅन्सल, रक्तदान शिबीर, फराळ वाटप, मोफत जलसेवा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तिसरा सोमवार व रक्षाबंधन सण असल्याने भाऊ-बहिणीचा हा सण ट्रस्टचे संचालक अनिल अग्रवाल हे शिवधाम मंदिर येथे असलेल्या वृक्षांना राखी बांधून सण साजरा करण्यात आला.

सरस्वती स्कुल
माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्था संचलित सरस्वती इंटरनॅशनल स्कुलमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वनक्षेत्र अधिकारी मधुकर नेमाडे होते. त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी रक्षाबंधन व बहिण-भाऊ यांचे पवित्र नाते यावर मुलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मुलींनी मुलांना राखी बांधली. यावेळी संस्थेचे सचिव निकिता सोनवणे, मुख्याध्यापिका वैशाली पाटील, रचना खिलोशिया, उषा राजपूत, प्रिती मेहेरा, नंदा कोळी, जयश्री पाटील, हर्षा सपकाळे, छाया सोनवणे, सोनाली सपकाळे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मनोज सपकाळे, गोपाल सपकाळे, प्रमोद बाविस्कर, उत्तम राठोड आदींनी परिश्रम घेतले.

कामगार-कल्याण केंद्र
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र पिंप्राळा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रिमांड होम येथे रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. मंडळातील महिला कर्मचार्‍यांनी सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातुन योग शिक्षक सागर साळी यांनी योग प्रशिक्षण केले. व त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर, शशिकांत फेगडे उपस्थित होते. प्रास्ताविक मिलिंद पाटील यांनी केले. सुत्रसंचलन भानुदास जोशी यांनी केले. तर आभार जागृती मोरे यांनी मानले.

विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभाग
विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुरे म्हणून जनता सह.बँकेच्या संचालिका सावित्री सोळुंखे, आरती जंगले उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत निवासी विभागातील परिसरातील वैशाली पाटील, श्वेता कुळकर्णी, प्रतिभा आंबोदकर, गायत्री पाटील, मिनाक्षी पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी सावित्री साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी शशिकांत पाटील, मनोहर बाविस्कर, सुनिल आर. वाघ, संजय आंबोदकर, महेश कुलकर्णी, विनोद पाटील, सुनिल वाघ, धिरज जावळे, संतोष वाळसे, हर्षल सोनवणे, विवेक फेगडे, प्रताप इंगळे, भानूदास पाटील, अजय चौधरी, नितीन पाटील, सुरेश पाटील, रविंद्र भोई उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*