सुर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळाचा वधू-वर मेळावा

0
जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाचा घटस्फोटीत-विधवा, विधूर वधू-वरांचा परिचय मेळावा नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट जवळील सुर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळाच्या सभागृहात पार पडला.
सुर्यवंशी क्षत्रिय मराठा युवा मंडळ व सुर्यवंशी क्षत्रिय मराठा महिला मंडळाच्यावतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव पंचायत समितीच्या सदस्या सुरेखा मराठे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळाचे सचिव दिलीप मराठे, कार्याध्यक्ष भरत काळे, संचालक विष्णू पाटील, कैलास मरारठे, शामबापू पाटील, प्रा.डी.बी.मराठे, माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड, सुरतचे नगरसेवक सोमनाथ मराठे आदी समाजातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वधू-वर परिचय मेळाव्याला मार्गदर्शन करतांना प्रा. निळकंठ गायकवाड यांनी सासू-सारे आणि वडीलधार्‍यांचा सन्मान केल्यास संसार सुखाचा चालतो असे सांगितले.

तर अशोक शिंदे यांनी अर्ध्य सत्यावर जाऊन आपले आयुष्य वाया घालवू नका असे आवाहन वधू-वरां केले. यावेळी अभिमन्यू सोनवणे, प्रा.डी.बी. मराठे, सोमनाथ मराठे यांनी देखील मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी तर आभार सोनू पाटील यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*