तापी नदीवरील बंधारा वाहिला

0

भुसावळ । दि.7 । प्रतिनिधी-शहरातील तापी नदी पात्रातील रेल्वेच्या जागेवर बांधण्यात आलेला बंधारा निकृष्ट कामामुळे वाहून गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

या बंधार्याच्या कामावर लाखो रुपये खर्च झाल्याने ते पाण्यात गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्यात भुसावळकरांना टंचाईचे चटके जाणवू नये यासाठी सत्ताधार्यांनी तापी नदीपात्रात बंधार्याचे काम केले होते.

या बंधार्यामुळे उन्हाळ्यात शहरवासियांना टंचाईची झळ बसली नाही. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच बंधारा वाहून गेल्याने सोशल मीडियावर विद्यमान सत्ताधार्यांवर विरोधकांनी टिकेची तोफ डागल्याने खळबळ उडाली आहे.

दरवर्षी लाखो रुपये पाण्यात
उन्हाळ्यात शहरवासियांना टंचाईची झळ जाणवू नये यासाठी तापी नदी पात्रात रेल्वेची परवानगी घेवून बंधार्याची उंची वाढविली जाते.

त्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. गेल्या 4 वर्षांपासून हा प्रकार यापुर्वीच्या व आताच्या सत्ताधार्यांनी सुरु ठेवला आहे. मात्र आवर्तन सुटताच पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर बंधारा वाहून जात असल्याने लाखो रुपये पाण्यात जात असल्याचे वास्तव आहे.

 

LEAVE A REPLY

*