भाऊंचे उद्यानात रंगली रंग बिरंगी राखी लेके आयी बहना सुरेल मैफील

0
जळगाव |  प्रतिनिधी : भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना, रंग बिरंगी राखी लेके आयी बहना या जुन्या गाण्याच्या मैफिलीचा आनंद जळगावकर रसिकांनी घेतला

‘रंग बिरंगी राखी लेके आयी बहना’ या संकल्पनेवर आधारित हा आगळा वेगळा कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात रक्षाबंधनच्या औचित्याने भवरलाल अँड कांताबाई फौंडेशन, स्वरवेध फौंडेशन आणि युवाशक्ती फौंडेशनतर्फे हा कार्यक्रम सादर केला गेला.

या कार्यक्रमाचे उदघाटन कॅप्टन मोहन कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा शक्ती फौंडेशनचे अध्यक्ष विराज कवडिया, अमित जगताप, किशोर कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वरवेध फौंडेशनचे अध्यक्ष भागवत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी अप्रतिम मराठी हिंदी गाणे पेश केले.
कार्यक्रमाचा आरंभ ‘तुज मागतो मी आता’ या गणेश वंदनेने झाला. यानंतर कार्यक्रमाची मैफिल रंगली.

धागा जुळला जीव फुलला, सोनीयाच्या ताटी, भैय्या मेरे राखीके बंधन को निभाना असे विविध हिंदी मराठी गाण्याचे सादरीकरण करण्यात आले. फ्रेंडशिप डे च्या औचित्याने दोस्ती चित्रपटातील शिर्षक गाणे देखील सादर झाले.

भागवत पाटील, ज्योती पाटील, अंजली धुमाळ, श्रुती जोशी, श्रुती वैद्य यांनी गायन केले. यांना साथ सांगत हार्मोनियम-सुशील महाजन, तबला – गिरीश मोघे, व्हायोलीन वसंतराव मोघे तर ढोलकवर प्रवीण महाजन होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पाटील यांनी तर आभारप्रदर्शन भागवत पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला भाऊंच्या उद्यानातील एंफी थिएटर श्रोत्यांनी फुलले होते.

LEAVE A REPLY

*