जिल्हा बँक भरतीत जिल्ह्यातील युवकांना संधी : बॅक पतपेढीच्या सभेत अध्यक्षा रोहीणी खेवलकर

0
जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रकिया रखडली आहे. जिल्हा बँकेतील अनेक कर्मचारी यावर्षी सेवानिवृत्त झाले आहे त्यामुळे कर्मचार्‍यांवर अतिरिक्त ताण वाढला आहे. कर्मचारी भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असून यात जिल्हयातील युवकांना संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही जिल्हा बँकेच्या चेअरमन ऍड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके वरिष्ठ नोकरांची सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण पतपेढीच्या सभागृहात पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. सभेप्रसंगी आ. राजुमामा भोळे, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, तिलोत्तमा पाटील, पतपेढीचे चेअरमन सुनिल पवार, जिल्हा बँकचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जिल्हा बँक कर्मचारी असोसिएशनचे किरण सांळुखे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ऍड. खडसे खेवलकर यांनी बँकेचे कर्मचारी कमी पगारात देखील चांगले काम करीत असल्याने त्यांच्या वेतनात नक्कीच वाढ करण्यात येईल असे सांगितले.

येत्या महिन्याभरात रखडलेल्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून या भरती प्रक्रियेत जिल्हयातील सुपुत्रांना संधी मिळावी यासाठी माजी महसुलमंत्री आ. एकनाथराव खडसे वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत असल्याचे ऍड. रोहीणी खडसे खेवलकर यांनी सांगितले.

यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी व बँक कर्मचार्‍यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक किरण सांळुखे यांनी तर सुत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

*