विश्वासाचं दुसरं नाव…

0

मैत्री… मैत्री.. म्हणजे नक्की काय ? असे विचारले तर . असे विचारणार्‍यांकडे इतरजण आश्‍चर्यचकित होत पाहतील. याला मैत्री म्हणजे काय माहिती नाही. हा परग्रहावरून आलेला दिसतो बहुधा असा टोमणाही मारल्याशिवाय राहणार नाही.

मैत्री… मैत्री.. म्हणजे नक्की काय ?
मैत्री म्हणजे ‘विश्‍वासाचं’ दुसर नाव.

ज्या नात्यात विश्‍वास असेल ती खर्‍या अर्थाने मैत्री. अशी मैत्री केवळ घराबाहेरील स्त्री अथवा पुरूषासोबत असते असे नाही. तर ही मैत्री, हे मित्रत्वाचं नातं. हा विश्‍वास पती-पत्नी, मुले यांच्यासोबतच परिवारातील प्रत्येक सदस्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.

असे म्हणतात की मुलांच्या पायात आईबापाची चप्पल बसायला लागली की तेव्हा आईबाबांच्या नात्याला मैत्रीची, मित्रत्वाची नवी पालवी फुटत असते.

पालवी… किती नाजूक, हळवी असते. तीला मायेची, प्रेमाची ऊब, विश्‍वासाचं संरक्षण मिळाल तर या पालवीचे रूपातंर मोठ्या वटवृक्षात होण्यास वेळ लागत नाही. असा वटवृक्ष हा कितीतरी वर्ष पारंब्याच्या मुळांवर जगत असतो. अशाच वटवृक्षाला देवांच्या बरोबरीने स्थान मिळते. त्याचीच सर्वजण पूजा करतात.

पण जर या पालवीला मायेची, प्रेमाची, समजुतीची आणि विश्‍वासाचे संरक्षण मिळाले नाही तर …..
इथे मैत्री आणि मित्रत्वाच्या कामाची सुरवात होते.

गल्लीपासून तर नोकरीपर्यंत, नोकरीपासून तर विवाहोत्तर पर्यंत सर्वांनाच मित्र- मैत्रिणी भेटत असतात. पण यात विश्‍वासास पात्र असे बोटावर मोजता येतील एवढेच मित्र गल्लीपासून तर विवाहोत्तरपर्यंत टिकत असतात. आयुष्यातील प्रत्येक चढउतारावर. चढाव (दु:ख) असेल तर ते मागुन तुम्हास ढकलत असतात. कारण चढावानंतर काही काळ हा विश्रांतीचा असतो.

त्यानंतर उतार सुरू होतो. अशा उतारावरही हे मित्र तुम्ही वेगाने घसरू नये म्हणून मैत्रीच्या धाग्याने तुम्हाला धिर देत हा उतार उतरण्यास मदत करतात. अवगुणांकडून सदगुणांकडे नेणारी मैत्री खरी असते. अशा मैत्रीला लाभाचा स्पर्शही होत नसतो. कारण ती डांेंगरदर्‍यांमधून वाहणार्‍या अवखळ झर्‍यासारखी असते.

आपल्या मित्राबाबतच्या या अपेक्षा जेव्हा व्यक्त करत असतो तेव्हा त्याची दुसरी बाजु पाहणे गरजेचे आहे. आपणही त्याचे चांगले मित्र होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मैत्रीच्या विश्‍वासाचा अर्थ समजुन घेतला पूर्ण जगात शंातता नांदून विकासाचा, प्रगतीचा नवा सुर्योदय होईल.

मैत्री केवळ मानवाशीच होेते असे नाही. तर तर पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीव निर्जीवांशीही होत असते. बाबा आमटेंचे मित्र पाहाल तर थक्क व्हाल. वाघ, सिंह, विषारी साप यासारखे जंगली प्राणी, पशु पक्षी आणि मानव ही त्यांचे मित्र आहेत.

जंगली प्राणी म्हटले की अंगावर शहारे येतात, त्यांच्याशी बाबा आमटेंनी मैत्री केली. कारण जंगली प्राण्यांनाही बाबा आमटेंबाबत विश्‍वास वाटला म्हणून ते त्यांचे सखा बनले. ते विश्‍वासानेच.

(संकलन/ शब्दांकन -पंकज पाटील)

LEAVE A REPLY

*