Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

गांधीधाम एक्सप्रेस पाण्यासाठी रोखली

Share
जळगाव । प्रतिनिधी :  रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बोगीतील प्रसाधनगृहात वेळीच पाण्याची व्यवस्था न केल्यामुळे पाण्याअभावी प्रवाशांची होत असलेली कुचंबणेसह दुर्गंधी असह्य झाल्याने जळगाव जंक्शन स्थानकावर बोगीतील प्रवाशांनी वारंवार चेनपुलींग करीत गाडी रोखून ठेवल्याची घटना रविवारी रात्री घडली.

पुरी गांधीधाम एक्सप्रेस एक तासाच्या वर विलंबाने स्थानकावरून रेल्वे पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने रवाना करण्यात आली. यामुळे स्थानकावर मागाहून येणार्‍या सुरत- भुसावळ, कुशीनगर, आझाद हिंद, शालीमार या प्रवासी गाडयांना फलाट उपलब्ध न झाल्याने किमान अर्धा ते एक तास प्रतीक्षा करावी लागली. या प्रकारातून स्वच्छता ही सेवा या ब्रिदवाक्याचा टेंभा मिरवणार्‍या मध्य रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांनी चांगलेच वाभाडे काढल्याची घटना रविवार रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.

पुरी गांधीधाम 22174 ही साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसच्या आरक्षित बोग्यांमधील प्रसाधनगृहात नागपूरपासून पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची तक्रार होती. वारंवार तिकीट तपासणीस, बोगी सुपरवायझर तसेच स्वच्छता कर्मचार्‍यांकडे ही बाब लक्षात आणून देखील संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने पुरी गांधीधाम सुपरफास्ट एक्सप्रेस जळगाव जंक्शन स्थानकावरून निघण्याच्या बेतात असतांनाच आरक्षित वातानुकुलित बोगीतील प्रवाशांनी प्रसाधनगृहात पाणी नसल्याची तक्रारीवरून चेनपुलींग करून गाडी पुढे जाणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.

नंदुरबारला पाणी भरण्याचे दिले आश्वासन

या बोगीतील तिकीट निरीक्षकाने नंदुरबार येथे पाणी भरण्यात येईल. गाडी सुटण्यास विलंब होत आहे, असे सांगीतल्यानंतर नागपूरपासून ते थेट भुसावळ दरम्यानच्या स्थानकांवर पाणी भरण्याची व्यवस्था असून देखील दुर्लक्ष करण्यात आले. नंदुरबार स्थानकावर गाडीला केवळ तीन मिनिटे थांबा आहे. एवढया वेळेत कसे भरणार असा संतप्त प्रश्न करीत असतांनाच आरपीएफ जवान व महिला अधिकारी यांनी ज्या प्रवाशांनी चेनपुलींग केली त्यांना खडसावून त्यांची आरक्षित तिकीटांचे क्रमांक तसेच नाव पत्ता घेवून कारवाई करण्याची भाषा केल्यानंतर प्रवासी आणखीनच संतापले. प्रसाधनगृहात पाण्याची व्यवस्था नाही. परंतु, किमान स्वच्छता करा, अशी मागणी केल्यानंतर बोगीतील स्वच्छता कर्मचारी बोलावून स्वच्छता झाल्यानंतर गाडी पुढे रवाना करण्यात आली.

स्वच्छता कर्मचारी असून देखील अस्वच्छता

आरक्षित स्लीपर वा वातानुकुलित बोग्यांमधे चल तिकीट निरीक्षक तसेच बोगी कंडक्टर, स्वच्छता कर्मचारी नियुक्त असून सुद्धा बहुताशं बोग्यांमध्ये बेसीन तसेच प्रसाधनगृह अस्वच्छतेमुळे पाणी तुंबुन ते संपुर्ण बोगीत पसरल्याने अनेक वेळा प्रवाशांना त्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. हा प्रकार पश्चिम रेल्वे मार्गावरील गाडयांमध्येे आहे, असे नाही तर मध्य मार्गावर देखील अनेक लांब पल्ल्यांच्या प्रवासी गाडयांमध्येे आरक्षित बोग्यामध्येे अस्वच्छता असल्याने झूरळ, उंदरांचे मोठे प्रमाण आहे. अनेकवेळा प्रवाशांच्या सामानाची अडगळीचा आडोसा घेऊन चक्क त्यांच्या बॅगा पिशव्यांमधून या उंदराव्दारे सामानाची नासाडी केल्याचे दिसून येते.

फलाटांवरील लिप्ट नादुरूस्तच

जळगाव जंक्शन अ दर्जा प्राप्त स्थानकावर सद्य:स्थितीत नविन पादचारी पूल निर्मितीचे कार्य प्रगतीपथावर असल्याने एकच पादचारी पूल कार्यान्वित आहे. त्यामुळे स्थानकावर एकाचवेळी एकपेक्षा अधिक गाडया आल्यास प्रवाशांची मोठया प्रमाणावर गर्दी होते. स्थानकावरील फलाट क्रमांक 2 तसेच स्थानकाबाहेरील लिप्ट नादुरूस्त झाल्याने गेल्या पाच ते सात दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. लिफ्टमध्ये एकाचवेळी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने लिप्ट अडकुन पडते. अशावेळी लिफ्ट चालवण्यासाठी लिप्टमनची आवश्यकता असून देखील रेल्वेप्रशासनाकडून या आवश्यक बाबींकडे दुर्लक्षच केले जात आहे.

या लिफ्टमध्ये बर्‍याचवेळेस फलाटांवरील टवाळखोरच या लिफ्टमध्ये विनाकारण बटनांशी खेळतात. आरक्षित डब्यांमधे निंबाच्या काडया, केळी पानांचे गठ्ठे बर्‍याच वेळा स्वच्छतागृहात वा रस्त्यातच ठेवलेले जात असल्याने सर्वच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. यात रेल्वेस्थानकांवरील कर्मचारीवर्गाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.

[button color=”” size=”” type=”round” target=”” link=””]प्रत्येक प्रवासी गाडीत भुसावळ येथे वॉटरींग करण्यात येते, ही घटना घडली किंवा काय याविषयी माहिती नाही. रेल्वे पोलीस प्रशासनाने कोणती कारवाई केली याची माहिती घेण्यात येईल.
– अरूण पांडेय,
स्थानक प्रबंधक,जळगाव.[/button]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!