मैत्रीचे रेशीम बंध

0

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे मैत्री दिवस. जन्माला आल्यापासून केवळ नजरेतून झालेल्या त्या मैत्रीतून उमगलेला मित्रत्वाचा अर्थ आणि त्या अर्थातून कळालेले जगण्याचं मर्म.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगण्याचं बळ देते. एक आत्मिक प्रेरणा देत. घरापासून सुरू झालेलं मैत्रीचं पर्व गल्लीबोळात रूजत शाळा महाविद्यालयात बहरत. पण या बहरण्याला जर कुसंगतीचा थोडाही स्पर्श झाला तर हे बहरणं तापदायकं ठरत.

अशावेळी वेळीच सावध होणं केव्हाही चांगले. असे असले तरीही मैत्रीचा हा रेशीम बंध सर्वांना हवाहवासा वाटतो. अशा या रेशीम बंधाबाबत…..

मैत्रीची सुरवात जन्मत: होते. जन्म झाल्यानंतर आई ही पहली मैत्रीण असते. तीचं ते लाडीवाळपण पाहणं, गालाला बोटांनी केलेली गुदगुली ही प्रेम, विश्‍वास, ओळख देते. त्यानंतर ओळख होते ती वडीलांची. वडीलांकडूनही प्रेम, जिव्हाळा, कठोरता, धैर्याची ओळख होते.

तर घरातील इतर सदस्यांकडून जिद्द, शेअरींग, आपलेपणा, बंधुत्वता, सामाजिक कर्तव्यांची ओळख होते. हे रक्तांच नात असलं तरी त्यात मैत्रीचं नात खूप मोठं असत.

हे मैत्रीचं नात तुम्हाला ‘उत्ू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको’ ची शिकवण देत असते. तर अपयशात खचू नको, हार मानू नकोस, शर्यत अजून संपलेली नाही, कारण अजून तू जिंकलेला नाहीस’ ची शिकवण देते. मैत्रीचा हा रेशीम बंध आपल्या जन्मापासून तर अंतिम श्‍वासापर्यत जुळलेला असतो.

प्रसंगानुरूप इतर सदस्य भलेही तुमच्यापासून दूर जातील. पण आई वडील, भाऊ, बहिण, पत्नी हे तुमच्या यशापयशात तुमच्या सोबतच असतात. ते नेहमी तुमच्या भल्याचाच विचार करत असतात. अशा या रेशीम बंधांत स्व: च्या अहंकाराची किंवा गैरसमजाची बाधा झाली तर….

त्यांच नव्हे तर आपलचं नुकसान होत असते. आणि म्हणून परिवाराचे, परिवारातील सर्व सदस्यांसोबत असलेले हे मैत्रीचं नात टिकवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आजच्या विज्ञान युगात मोबाईलवरील फेसबुक, मॅसेंजर, व्हॉटसऍप वर आईवडीलांशी संपर्क होत असला तरी तो आभासी असतो. बाथरूममधल्या शॉवरखाली भिजण्याची सर रिमझिम पावसात भिजण्यात येणार नाही. म्हणून परदेशात मदर, फादर डे असतात. तसे होऊ देवू नका.

आईवडील आपले खरे मित्र असतात. किंबहूना तसं नात आईवडीलांसह मुलांनीही तयार करणे गरजेचे आहे. हे नातं जेव्हा तयार होईल तेव्हाच खरा मैत्री अन मातृपितृ दिन.

हे झाले कुटूंबातील मैत्रीच्या नात्याबाबत. कुटूंबाच्या बाहेर जेव्हा आपण जात असतो तेव्हा कळत नकळत अनोळखींशी कोणत्या ना कोणत्या कारणाने तरी बंध जुळू लागतात. या बंधांना विश्‍वासाची, श्रध्देची साथ मिळते अन् त्या अनोळखीचं मैत्री नामक नात्यात रूपांतर होतेे.

‘रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात
पण,
नाते नसतांनाही ही जी बंधने जुळतात त्या रेशीम बंधांनाच ‘मैत्री’ म्हटले जाते.

लोकशाही प्रणालीचे जनक अंब्राहंम लिंकन मैत्री बाबत फार सुंदर सांगतात. ते म्हणतात की मैत्री हा जर तुमचा विक पॉंईट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात.

आजच्या फेसबुक नामक आभासी पुस्तकाने तर जगाच्या कानाकोपर्‍यातील अनोळखीशी मैत्रीचे बंध जुळवले आहेत. यातील किती खरे आणि किती खोटे हे वेळप्रसंगी माध्यमातून वाचतच असतोच.

म्हणून म्हटले जाते की फेसबुकवर हजारो मित्र जमा करणे ही अचीव्हमेंट नाही. ज्यावेळी हजारो लोक तुमच्या विरुध्द उभे राहतात तेव्हा तुमच्या बाजुने उभा राहणारा एक मित्र उभा करता येणे ही खरी अचीव्हमेंट आहे.

संकटसमयी जो मदत करतो तोच ख्ररा मित्र ही म्हण आपण बालपणापासून वाचत आलेलो आहे. ती उगाच शिकवलेली नाही. एका अनोळखी माणसाचे रूपांतर मित्रात व्हावं ही आनंदाची गोष्ट आहे. पण एका मित्राचे अनोळखी माणसात रूपांतर होणं ही सर्वात वाईट बाब आहे.

विज्ञान युगातील मैत्री पाहता ती किती स्वार्थी आणि किती निस्वार्थी आहे याचा जो तो त्यात्या प्रसंगानुसार अनुभव घेत असतो. खरी मैत्री आपल्या आयुष्याचाच एक भाग बनलेली असते.

कारण आयुष्य बदलतं
गल्लीपासून तर वर्गापर्यंत,
वर्गापासून तर कॉलेजपर्यत,
कॉलेजपासून तर ऑफसपर्यंत,
पुस्तकापासून तर फाईलपर्यंत,
हाप पॅन्टपासून तर जीन्स पर्यत,
जीन्सपासून तर फॉर्मलपर्यंत,
पॉकेट मनीपासून तर पगारापर्यंत,
मैत्रीणीपासून तर प्रेयसीपर्यत,
प्रेयसीपासून तर पत्नीपर्यत

सार बदलत असत. पण खरे मित्र मात्र तेच असतात जे या सर्वांमध्ये योग्य साथ देतात. आजच्या वास्तवात मैत्रीची
रूपे बघितली तर तर निस्वार्थीपेक्षा स्वार्थीच जास्त दिसते. त्या बदल्यात मला काय मिळेल यावरच मैत्रीचं नात टिकत असत.

पिझ्झा नी बर्गरसारखी मैत्री होत आहे. शाळा महाविद्यालयातील मैत्री नोकरीत आणि पुढे टिकलेली, टिकवलेली तसे बोटावर मोजण्याइतकेच. त्यातही शंका नी अर्थकारण आले की या रेशीम बंधाचे धागे तुटू लागतात. शाळा कॉलेजमधील मुलामुलींच्या मैत्रीबाबतही चांगले वाईट वाचावयास मिळते.

यात कोणाच ंचुकते यापेक्षा आपल्या मैत्रीचा आदशर्र्र् कसा तयार करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मैत्रीचा बॅन्ड बांधून खरी मैत्री होईलच असे नाही. मित्राला / मैत्रीणीला चांगल्या कामात प्रेरणा देणारे, संकटात मदत करणारे, त्याच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणारे व चुकत असल्यास दोन खडे बोल सुनावणारे खरे मित्र.

अशा मित्रांचे कधीही वाईट वाटून घेवू नका. कारण तेच तुमचे घराबाहेरचे हितचिंतक असतात. तुमच्यातील दुर्गूणांचे रूपांतर सदगुणात करणारे खरे मित्र असतात. अशा मैत्रीत अर्थकारण नकोच.

ऐकमेकांना मदत करून यशाचे शिख्रर गाठणारी मैत्री असावी. तरच हा मैत्रीचा रेशीम बंध बहरतो, फुलतो आणि त्याचा सुवास हा सर्वत्र दरवळतो. फेसबुक, मॅसेंजर, व्हॉटसऍप यासारख्या सोशल मिडीयातून येणार्‍या खर्‍या मित्रांच्या संदेशामुळे त्रासून जावू नका, किंवा तो रिकामा आहे असेही समजु नका, तो तुम्हाला चंागले संदेश पाठवतो यासाठी की तो तुम्हाला त्याचा ‘बेस्ट फ्रेंड’ मानत असतो.

तुमची दिवसाची सुरवात चांगली, प्रसन्न व्हावी आणि तुम्हाला मदतीची गरज लागली तर ती करता यावी म्हणून तो तुमच्या संपर्कात राहत असतो. याचाही विचार केला जावा, परंतू हे त्रासदायक नसावे.

आजच्या या मैत्री दिनी अनेकांना शाळा कॉलेजातील त्या सुवर्ण दिवसांतील मित्र-मैत्रिणींची आठवण होईल. शाळा कॉलेजच्या काळात केलेली मस्ती, स्नेहसंमेलनात केलेली धम्माल, सहली निमित्ताने, प्रोजेक्ट निमित्ताने केलेले पर्यटन / स्टडी टुर, काढलेले फोटो हे सारे आठवते.

पण त्यातही आठवतो तो / ती ज्याने ओळख नसतांना संकटात केलेली मदत आणि त्याच मदतीतून झालेली मैत्री आणि जुळलेले हे रेशीम बंध. आज त्याच्या / तीच्या संपर्कात असाल तर करीअरसाठी मदत करा, पुन्हा एकदा कौटूंबक मैत्रीचे नवे रेशीम बंध तयार करा. मैत्रीचे नवे सर्कल तयार करा.

शाळा कॉलेजला नसतांनाही कौटूिंबक मैत्रीच्या रेशीम बंधाचा नवा अध्याय आजच्या या मैत्री दिनाच्या निमत्ताने सुरू करू या. आजच्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

LEAVE A REPLY

*